24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरहजारो आई-वडिलांची सेवा करणारा भक्­त पुंडलिक

हजारो आई-वडिलांची सेवा करणारा भक्­त पुंडलिक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आपण अध्यात्मिक जीवनामध्ये पुंडलिकाची कथा ऐकली असेल पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या सेवेमध्ये एकढा तल्­लीन राहतो की, त्यांच्या भेटीसाठी साक्षात पांडुरंगालाही थांबावे लागले हे वास्तव आहे. त्याच पध्दतीने आधुनिक युगातही हजारो आई-वडिलांची सेवा करणारा आधुनिक पुंडलिक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या रूपाने लातूरकरांना मिळालेला असल्याचे प्रतिपादन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

बसवेश्­वर चौकामध्ये पंढरपूर दर्शनासाठी आजोबा बळवंतराव पाटील कव्हेकर व आजी सोजरादेवी पाटील कव्हेकर यांच्या स्मरणार्थ युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून २५ टॅ्रव्हल्सच्या माध्यमातून १ हजार २५० भाविकांना पंढरपूर येथे विठ्ठल-रूक्मिनीच्या दर्शनासाठी रवाना करण्यात आले. या काढण्यात आलेल्या माता-पिता यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, ह.भ.प.श्रीरंग महाराज औसेकर, भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, रंजितसिंह पाटील कव्हेकर, विश्­वजीत पाटील कव्हेकर, मंगलबाई पाटील, अनिताताई कदम, प्रमोदिनीताई पाटील, अशोकराव पाटील, सुभाषअप्पा सुलगुडले, आप्पासाहेब पाटील, बालाजी शेळके, संजय गिर, मुध्याध्यापिका सुनिता मुचाटे, सुनिल राठी, दिग्वीजय काथवटे, दीपक मठपती, शोभाताई भोसले, मुख्याध्यापक मोहन खुरदळे, प्रताप शिंदे, ज्ञानेश्­वर चाटे, कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

कव्हेकर म्हणाले की, अध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा निष्ठेने केली हे सर्वश्रुत आहे. त्यांच्यावर प्रसन्­न होऊन भगवान पांडुरंग भेटीसाठी वेळ मागितला तरीही, आई-वडिलांच्या सेवेला प्राधान्य देऊन त्यांनी पांडुरंगाला थांबविले. यातून त्यांची आई-वडिलांप्रतीची सेववृती समोर आली. त्याचपध्दतीने अध्यात्मिक विचाराने प्रभावीत होऊन अजितनेही हजारो भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिनीचे दर्शन घडविण्याचा संकल्प केला आणि त्याची आज परिपूर्तीही केली. योग आणला ही आनंदाची बाब आहे.

ह.भ.प. औसेकर म्हणाले की, जीवनात येऊन एकदातरी पंढरपूरला जावे आणि विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, ही प्रत्येक भाविकांची इच्छा असते. परंतु त्याची परिपूर्ती होत नाही. पंरतु आधुनिक काळातही पुंडलिकरूपी असलेल्या अजित यांनी त्यांचीही परिपूर्ती घडवून आणण्याचा संकल्प केला आणि हजारो भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची संधी मिळाली. यामुळे त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या