23.3 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home लातूर शेतरस्ते मोकळे करण्यासाठी धडक मोहीम हाती घेणार

शेतरस्ते मोकळे करण्यासाठी धडक मोहीम हाती घेणार

एकमत ऑनलाईन

औसा : येणा-या काळात नकाशावरील शेतरस्ते मोकळे करण्यासाठी मतदारसंघात धडक मोहीम हाती घेतली जाणार असून यासाठी शेतक-यांनी सहकार्य करुन रस्ते अतिक्रमणमुक्त करुन मोकळे करावे, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघात अतिवृष्टीने नुकसान क्षेत्राची पाहणी करतेवेळी केले आहे.

आमदार पवार यांनी १७ व १८ ऑक्टोबर रोजी मतदारसंघातील मातोळा, आशिव, उजनी, एकंबी, बेलकुंड, माळकोंडजी, तुंगी, कासार बालकुंदा, तांबाळा, लिंबाला, सरवडी येळणुरे, धानोरा, कलमुंगळी, चांदोरी, मदनसुरीसह अन्य काही गावांचा दौरा करून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची, रस्ते व पुलाची पाहणी केली.व लोकांशी संवाद साधत त्याच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, शासनाने केलेले पंचनामे ग्रा धरले जावेत अशी आपली मागणी असून अतिवृष्टीने जमीन वाहून गेलेल्या शेतक-यांचे वेगळी पाहणी व पंचनामे केले जाणार असून हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये अशी २ हेक्टर पर्यंतची मदत दिली जाणार आहे.

तसेच येणा-या काळात शेतरस्ते मोकळे करण्याची धडक मोहीम हाती घेतली जाणार असून यासाठी शेतक-यांनी सहकार्य करुन मनरेगातून गावाचा विकास करण्यावर अधिक भर दिला पाहिजे या योजनेतून वैयक्तिक व गाव विकासाच्या सर्वागिण विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध असून याचा फायदा करून घ्यावा असे सांगून नकाशावरील शेतरस्ते मोकळे करुन घेण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे. या कामात अडथळा निर्माण करण्यावर संबंधित प्रशासन कायदेशीर कारवाई करणार आहे.

यावेळी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष काकासाहेब मोरे, संतोष मुक्ता, संजय कुलकर्णी,नायब तहसीलदार वृषाली केसकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिंिलद लातुरे, माजी सभापती ज्ञानेश्वर वाकडे, पंचायत समिती सदस्य बळीराम पाटील, जिलानी बागवान, नितिन पाटील,व्यंकट माने, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पटेल, नायब तहसीलदार माहापुरे, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता गंथडे, आदीसह संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच, प्रशासक, शेतकरी व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शासनाकडून शेतक-यांना दिलासा मिळेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या