लातूर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस : व्हिडिओमध्ये तुम्हाला पावसाचा जोर निश्चितच लक्षात येईल
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरामध्ये आज दुपारी ३ च्या सुमारास जबरदस्त पाऊस झाला. वाहनांची ये जा बºयाच वेळ थांबली होती. अचानक जोरदार पाऊस झाल्याने अगदी कमी वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाचा जोर खूप होता. यावेळी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पावसाचा जोर निश्चितच लक्षात येईल. हा पाऊस लातूर व परिसरात बºयाच प्रमाणात झाला.कमी वेळ पाऊस पडला असला तरी अगदी ‘धो डाला’ अशी प्रतिक्रिया काहिंनी व्यक्त केली.
परिसरात रात्री पुन्हा पावसाची भूरभूर सुरु झाली होती़
लातूर जिल्ह्यात गुुरुवारी संपूर्ण दिवसभर आणि सायंकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ काही तालुक्यांत दिवसभर पावसाची भूरभूर सुरु होती़ लातूर शहर व परिसरात रात्री पुन्हा पावसाची भूरभूर सुरु झाली होती़
बºयाच वर्षांनंतर यावर्षी पावसाने लातूर जिल्ह्यावर कृपादृष्टी ठेवलेली दिसून येत आहे़ मृगाचा पाऊस अगदी वेळेवर पडला़ त्यानंतरही पावसाने कायम हजेरी लावलेली आहे़ जुन-जुलै हे दोन महिने संपत नाहीत तोपर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या ४२ मिली मिटरपर्यंत पाऊस झाला आहे़ या पावसामुळे पिके जोमात आहेत़ लातूर, औसा, निलंगा, शिरुर अनंतपाळ, देवणी, जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकुर, रेणापूर या दहाही तालुक्यात कमी, अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे़ मोठा खंड न पडता पाऊस हजेरी लावत असल्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांसह पाझर तलावात पाण्याची पातळी बºयापैकी वाढताना दिसून येत आहे़
Read More जिल्ह्यात २८१६ परसबागा विकसित