18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरलातूरात डिझेल शंभरीपार

लातूरात डिझेल शंभरीपार

एकमत ऑनलाईन

लातूर : इंधनांच्या दरांत रविवारी पुन्हा वाढ करण्यात आल्यानंतर लातूरात डिझेलचा दर शंभरीपार गेला आहे. त्यामुळे डिझेलवर चालणा-या वाहनांधारकांनी अश्चर्य व्यक्त केले आहे. कारण आतापर्यंत कधीच लातूरात डिझेल शंभरीपार झालेला नव्हता.

डिझेल १००.०४ रुपये प्रति लिटर अशी लातूरच्या इतिहासात पहिल्यांदा अश्चर्याची घटना घडल्याचे वाहनधारक सांगत आहेत. पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३० पैशांनी तर डिझेलच्या दरांत लिटरला ३५ पैशांनी वाढ करण्यात आल्याचे सरकारी तेल कंपन्यांच्या अधिसूचनेत नमुद करण्यात आले आहे. सलग पाच दिवस करण्यात आलेल्या वाढीमुळे इंधनांचे दर विक्रमी पातळीवर पाहोचले आहेत. लातूर शहरात डिझेलचे दर लिटरला १००.०४ रुपये तर पेट्रोल दर प्रति लिटर १११.०६ रुपये झाले आहे. डिझेल, पेट्रोलचे हे दर आजवरचे सर्वाधिक मानले जात आहे. इंधन कंपन्यांनी बुधवारपासून इंधन दरवाढीचा मोठा भार ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत पेट्रोलचे दर ३० पैशांनी तर डिझेलचे दर ३५ पैशांनी वाढवण्यात आले आहे.

भारत इंधनाची जवळजवळ संपूर्ण आयात करत असल्यामुळे देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय किमतींच्या बरोबरीने ठेवल्या जातात. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट कच्च्या तेलाचे दर बॅरलमागे ८२ अमेरिकी डॉलरहून अधिक असल्यामुळे इंधनाचे दर भडकले आहेत. तेलाचे उत्पादन दररोज ०.४ दशलक्ष बॅरलहून अधिक घेतल्याने इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहेत, असे शहरातील एका पेट्रोल, डिझेल विक्रेत्याने सांगीतले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या