23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरशिक्षकेत्तर कर्मचा-यांमध्ये डिजिटल संस्कृती विकसित व्हावी

शिक्षकेत्तर कर्मचा-यांमध्ये डिजिटल संस्कृती विकसित व्हावी

एकमत ऑनलाईन

लातूर : सध्याचे युग हे संगणकाचे युग असून या युगात प्राध्यापकांबरोबर शिक्षकेत्तर कर्मचा-यांमध्ये संगणकाची ओळख व संगणक कौशल्य जास्तीत-जास्त विकसित होण्याची गरज आहे. म्हणूनच त्यांच्यामध्ये डिजिटल संस्कृती विकसित व्हावी म्हणून महाविद्यालयात गेल्या आठ वर्षापासून अशा कार्यशाळा सातत्याने आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळेच महाविद्यालयाचा, कार्यालयीन कामकाजाचा, संस्थेचा आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या ज्ञानाचा सर्वांगीण विकास होतो.े, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी केले.

दयानंद विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातर्फे ‘शिक्षकेत्तर कर्मचा-यांमध्ये डिजिटल संस्कृती विकसित करणे’ या विषयावर दि. ४ जुलै ते ८ जुलै यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय संगणक साक्षरता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, डॉ. ललित ठाकरे, डॉ. रोहिणी शिंदे, सुदर्शन सर्जे व प्रा. संगीता जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपप्राचार्य डॉ. बेल्लाळे म्हणाले की, कोणत्याही महाविद्यालयाच्या जडणघडणीत शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे फार मोठे योगदान असते. महाविद्यालयाच्या विकासाचा ते मुख्य आधारस्तंभ असतात. शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी संगणकाच्या आधुनिक काळात संगणकाचे अद्ययावत ज्ञान घेऊन डिजिटल, संगणकीय संस्कृती आणखीन विकसित करावी, असे ते म्हणाले. डॉ. ठाकरे यांनीही शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी बदलत्या काळानुसार संगणकाचे ज्ञान आत्मसात करून स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर महाविद्यालयाचाही विकास करावा. प्रास्ताविक डॉ. रोहिणी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वैभव कुलकर्णी यांनी केले. तर आभार प्रा. संगीता जाजू यांनी मानले. याप्रसंगी प्रा. श्वेता लोखंडे, प्रा.अमोल सांजेकर, प्रा. निकिता शिंदे, प्रा. चांडक, प्रा. लहू काथवटे, प्रा. मंगेश आवाळे, प्रा. सुजाता काळे, प्रा. मंगेश सुगरे, डॉ. रामशेट्टी शेटकार, प्रा. शिवाजी सोमवंशी, प्रा. जाधव, प्रियंका हिप्परकर, अक्षय कुलकर्णी, राजेसाहेब पांचाळ, चित्ते, नंदिनी जाधव, संतोष कंदकुरे, पांडे, विशाल, राहुल बनभेरू यांच्यासह आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या