लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदगाव येथील विविध विकास सेवा सहकारी संस्थेच्या नुतन संचालक मंडळाचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नांदगाव सोसायटीच्या निवडणुकीत विकासरत्न विलासराव देशमुख सहकार पॅनलचे प्रमुख सुधाकर पाटील, आनंद पाटील, सतीश कुलकर्णी, व्यंकट घोडके यांनी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १३ उमेदवार दिले होते. या पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार निवडून आले आहेत. विजय उमेदवारांमध्ये सतीश कुलकर्णी, आनंद पाटील, व्यंकट घोडके, दिलीप पाटील, भगवान ढमाले,
राम ढमाले, नंदकुमार पाटील, सिद्धाजी माने, विष्णु वाघमारे, बळीराम कळबंडे, मुरलीधर कांबळे, चंद्रकला जगताप, सुरेखा चिगुरे यांचा समावेश आहे. विकासरत्न विलासराव देशमुख सहकार पॅनलच्या विजयासाठी महादेव बनसोडे, बापुराव साळुंके, महेबुब पठाण, गोविंद कोठीवाले, बब्रुवान ढमाले, बळीराम ढमाले, दीपक कुलकर्णी, बालासाहेब गव्हाणे, अॅड. बळीराम माने, कमलाकर इडेकर, विष्णु माने, वसंत ढमाले, कैलास पाटील, श्रीपाल वाघमारे, रोहित पाटील, राजाभाऊ माने, सुरेश पाटील यांनी सहकार्य केले.