शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचे विद्यमान चेअरमन कल्याणराव बरगे व उपसरपंच राजकुमार पाटील यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत. सोसायटीच्या सर्व संचालकांनी मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी पॅनलप्रमुखांसह सर्व नूतन संचालकांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर,बाजार समिती सभापती लक्ष्मणराव बोधले,चेअरमन कल्याणराव बरगे, उपसरपंच राजकुमार पाटील, माजी सरपंच अब्दुलअजीज मुल्ला, माणिकराव पाटील,श्रीपती कुंभार, बब्रुवान भक्किा,सुभाष लुल्ले,नूतन संचालक राजेंद्र साकोळे,संजय भुरे, संजय महाजन,राजकुमार काळु, कलप्पा लुल्ले,दत्ता पाटील,उस्मानसाब मुल्ला,महिला प्र.प्रकाश दामा, बाबुराव आवाळे,शेषेराव माळी, कृष्णा कडेकर, आण्णाराव ंिंशदे उपस्थित होते..सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे खंदे समर्थक विद्यमान चेअरमन व उपसरपंच राजकुमार पाटील यांनी महाविकास शेतकरी पॅनल उभारून सोसायटी निवडणुकीत बहुमताने सर्व जागा ंिजकत आपले वर्चस्व निर्माण केले.
त्यानंतर सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी सर्व नुतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी सभासदाच्या आर्थिक उन्नतीसाठी काम केले असून यांपुढे ही आपले मार्गदर्शन कायम राहावे असे चेअरमन कल्याणराव बरगे यांनी सांगितले.तर साकोळ सोसायटीला येणा-या काळात ही मदत करू असे सांगून माजी मंत्री दिलीपराव
देशमुख यांनी सर्व नुतन संचालकांना शुभेच्छा दिल्या.