16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeलातूरचाकूर बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य

चाकूर बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य

एकमत ऑनलाईन

चाकूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, याकडे राजकीय नेते, तसेच महामंडळाचे वरिष्ठ अधिका-यांचे दुर्लक्ष असल्याने बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, प्रवासी संताप व्यक्त करताना दिसुन येत आहेत. या बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थ्यांची ही मोठी संख्या आहे. त्यांना अक्षरश: नाकाला रुमाल लावून थांबाव लागत आहे. या बसस्थानक परिसरात स्वच्छतागृह, मुतारी नाही. पाण्याची ही व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. थोडाही पाऊस पडला तरीही बसस्थानकात सर्वत्र चिखल होत असतो. परिसरात झालेल्या चिखलातून प्रवाशांना बसमध्ये बसावे आणि उतरावे लागत आहे.

बसस्थानकात महिला आणि पुरुषांना स्वतंत्र शौचालय निर्माण झाले पाहिजेत. बसस्थानक परिसरात विद्युत प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली पाहिजे. बसस्थानक परिसरातील घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.तसेच बसस्थानकाच्या समोरच्या बाजूला शापींग कॉम्लेक्स बांधुन व्यापारी तथा व्यावसायिक यांना भाडेतत्त्वावर देऊन महामंडळाच्या उत्पन्नात वाढीसाठी निश्चीतच मदत होईल. येथे महामंडळाचा डेपो झाला पाहिजे तसेच येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या पाहीजेत ग्रामीण भागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी विशेष शटल बसेस सुरू कराव्यात.
सुविधांसाठी प्रहार जनशक्ती प्रयत्न करणार प्रहार जनशक्ती पक्ष बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करणार आहे, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष वर्धमान कांबहे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या