22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeलातूरशिक्षण विभागाकडून शिक्षकांची निराशा

शिक्षण विभागाकडून शिक्षकांची निराशा

एकमत ऑनलाईन

निलंगा : लक्ष्मण पाटील
लातूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची दिवाळीपूर्वी पगार झाली नसल्याने शासन व जिल्हा परिषदे बाबत शिक्षकामधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. शासनाने दिवाळी आगोदर शिक्षकांच्या पगारी होणार असल्याचा जीआर म्हणजे ही शासनाची शुद्ध फसवेगिरी असल्याचे शिक्षकामधून चर्चिले जात आहे. दिवाळीपूर्वी शिक्षकांची पगार न झाल्याने शिक्षकांना उसणवारी करून दिपावलीचा सण साजरा करावा लागला.

निलंगा तालुक्यात १९२ जिल्हा परिषदेच्या शाळेवर ८३१ प्राथमिक व २८ माध्यमिक असे ८५९ शिक्षक कार्यरत आहेत. दिवाळी सारख्या मोठया सणामुळे शासनाने मोठा गजा वाजा करीत दिवाळी आगोदर कर्मचा-र्यांच्या पगारी होतील म्हणून जीआर काढले. यामुळे कर्मचा-यांच्या आशा पल्लवीत झाल्या. कर्मचा-यांनी पगार वेळेवर होणार असल्याने दिवाळी थाटामाटात साजरा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मात्र शासन व जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे की काय जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारी अद्याप झाल्या नाहीत.

दिवाळी सारखा मोठा सण कर्मचा-यांना पगारी विना काढत तारेवरची कसरत करावी लागली. शासन व जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे जिल्हा परिषद शिक्षकांना दिवाळी सणात पगारीमुळे वंचित रहावे लागले असल्याचे शिक्षक वर्गातून बोलले जात आहे. पगारी झाल्या नसल्याने दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करावी लागली असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. बजेट अभावी पगारी झाल्या नसल्याचे सांगण्यात येते. दिवाळी सारखा मोठा सण असतांना बजेटचे नियोजन करण्यात शासन व प्रशासन कमी पडले की काय म्हणून शिक्षकांना पगारी विना दिवाळी साजरी करावी लागली असल्याचे शिक्षकातून बोलले जात आहे.

दिवाळीपुर्वी पगार हे आश्वासन फोल ठरले
दिवाळीपुर्वी शिक्षकांचा पगार करा हा काढलेला शासननिर्णय म्हणजे शिक्षकांची शुध्द फसवणुक असुन दिवाळीपुर्वी पगार हे आश्वासन फोल ठरले आहे. शासन व जि प बाबत शिक्षकामध्ये खुप मोठा प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. जि प स्तारावरील सर्व पदोन्नत्ती फक्त शिक्षण विभागातील उदासिनतोमुळे झाल्या नाहीत. चार महिन्यापासुन पदोन्नत्तीचे काम चालु आहे. त्याची पुर्तता आजप्रर्यंत झाली नाही. गेल्या दोन वर्षापासुन पदोन्नत्ती नाही. पदोन्नत्तीशिवाय अनेक शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. याला जबाबदार कोण? शिक्षक समिती लातुर तथा नि.ता जि प शिक्षक पतसंस्ता निलंगाचे चेअरमन अरुण सोळुंके प्रश्न उपस्थित केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या