23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूररेणा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

रेणा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

एकमत ऑनलाईन

रेणापूर : तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने मंगळवारी दि. ९ रोजी प्रकल्पाचे पुन्हा दोन दरवाजे १० सें.मी. दुपारी २ वाजतस उघडून पाण्याचा रेणा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेणा प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाची पाणी पातळी टप्याने टप्याने वाढत गेली. दि. १४ व २८ जुलै रोजी प्रकल्पाची दोन दारे १० सें.मी. उघडण्यात आली होती. पाण्याचा ओघ कमी झाला की दोनही दारे बंद करण्यात आली.

सोमवारी दि. ८ ऑगस्ट रोजी सांयकाळी व रात्री दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पात येणारा पाण्याचा ओघ पाहता व प्रकल्पात ९८.५८ टक्के पाणीसाठा जमा झाल्याने मंगळवारी दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वा. पुन्हा प्रकल्पाची सहापैकी दोन दारे १० से.मी.उघडण्यात येऊन रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे १० सेंमी ने उघडून १७.७६ क्यूसेक्स व ६२७.१० क्यूसेक्स प्रकल्पातील पाण्याचा रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत अल्याची उपविभागीय अभियंता एस.एम.निटूरे,प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एस. पी. डब्बे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित राहून रेणा मध्यम प्रकल्पावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या