26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूररेणा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

रेणा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

एकमत ऑनलाईन

रेणापूर : रेणा मध्यम प्रकल्पात ९७.६५ टक्के जलसाठा झाला असून धरण क्षेत्रात पाण्याची आवक सुरु असल्याने सोमवारी मध्यरात्री धरणाचे दोन दरवाजे १० सेंमी ने उघडून या दोन दरवाजामधून रेणा नदी पात्रात ६२६.९४ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगीतले.

रेणा धरणातून पाणी सोडण्याची ही चौथी वेळ आहे. पहिल्यांदा १४ जुलैला दोन दरवाजे उघडून १९ तासात १.१२३ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परत धरण क्षेत्रात पाऊस पडल्याने धरणातील जल साठ्यात ९७.६५ टक्के वाढ झाली त्यामुळे गुरुवारी २८ जुलै ला दुस-यांदा रेणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. त्यानंतर ९ ऑगष्ट रोजी परत तिस-यांदा धरणातून पाणी सोडण्यात आले होते.

आत्ता सोमवारी (दि.६ सप्टेंबर ) मध्यरात्री सव्वा बाराला दोन दरवाजे १० सेंमी. उघडण्यात आले आहेत. रेणा प्रकल्पामध्ये सोमवारी (दि.६ सप्टेंबर ) २०.७३ दलघमी असा जिवंत पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठा-२१.२०२ दलघमी असुन ९७.६५ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. सध्याची पाणीपातळी ६०८.४५ मी (आरएल) एवढी धरणाची पाणीपातळी आहे. रेणा मध्यम प्रकल्पात आजपर्यंत १७ दलघमी पाणीसाठा जमा झाला. मंगळवारी दि. ६ सप्टेबर दिवसभर ०.५५८ दलघमी व बुधवारी दि. ७ सप्टेबर रोजी ०.५११ दलघमी दोन दरवाज्याद्वारे विसर्ग सुरू आहे. दोन दिवसात या प्रकल्पातून ०.०६९ दलघम विसर्ग झाल्याची माहिती शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.

रेणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
रेणा धरणातून रेणा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे रेणा नदी दुथडी भरून वाहत आहे. या अतिरिक्त पाण्यामुळे नदी काठच्या शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या शेतक-यांना व नागरीकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. धरणात जर असाच पाण्याचा साठा वाढत गेला तर आणखी दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागेल असही शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या