22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरसंपूर्ण लातूर शहराचे निर्जंतुकीकरण

संपूर्ण लातूर शहराचे निर्जंतुकीकरण

एकमत ऑनलाईन

लातूर : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने दि. ४ मे रोजी शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करुन शहर स्वच्छ आणि निरोगी करण्यासाठी महानगरपालिकेने ही मोहिम सुरु केली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनूसार महापौर विक्रांत गोजमगुुंडे, महापालिका आयुक्त अमित मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका सहायक आयुक्त मंजुषा गुरमे, स्वच्छता निरीक्षक रमाकांत पिडगे, स्वच्छता निरीक्षक किशोर रणदिवे व सर्व स्वच्छता निरीक्षकांनी दि. ४ मे रोजी शहरातील मेन रोड, बस स्टॉप, मेडीकल स्टोअर, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, लोकमान्य टिळक चौक, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर नाका, गंजगोलाई, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, गुळ मार्केट चौक, दयानंद गेट यासह शहरातील सर्वच गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्त्यांसह गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्याबरोबरच प्रत्येक प्रभागात धुर फवारणी व स्प्रिंग फवारणी केली जात आहे. लातूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यास प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने संचारबंदी जारी केलेले आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी मुभा देण्यात आलेली आहे. यावेळेनंतर मात्र रस्त्यावर विनाकारण कोणीही फिरणार नाही, अशी सूचना देण्यात आलेली आह. असे असले तरी काही लोक विनाकारण फिरताना दिसून येत आहेत. अशा लोकांची महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. इतकेच नव्हे तर अशा लोकांच्या कोरोना चाचण्याही केल्या जात आहेत. नागरिकांनी विनाकारण फिरु नये, अनावश्यक गर्दी करु नये, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, फिजिकल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा, आदी सुचना देण्यात आल्या आहेत.

सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना योग्य आणि चांगले उपचार मिळावेत, याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या शिवाय शहरातही स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दल व जेटर मशीन ट्रॅक्टरद्वारे शहरात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.

काँग्रेस केवळ निवडणुकीच्या काळात जागे होते आणि नंतर जिंकण्याचा भ्रमात राहते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या