27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरलातूर शहरातील पाच नगरांचे केले निर्जंतुकीकरण

लातूर शहरातील पाच नगरांचे केले निर्जंतुकीकरण

एकमत ऑनलाईन

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी

लातूर : लातूर शहरातील कूरेशी मोहल्ल्यातील ५, शामनगरमधील २, नारायणनगर सबुरी हनुमान मंदीर जवळील १, परिमल विषालयाजवळील १, मजगेनगर यश अपार्टमेंटशेजारील १, एमआयडीसी मैत्री अपार्टमेंट, गॅ्रड हॉटेलजवळील १ असे ११ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती शुक्रवारी आढळून आल्याने उपरोक्त सर्वच नगरांमध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर करुन सील करण्यात आले. तसेच या नगरांमध्ये तात्काळ सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच या कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे़

दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे़

लॉकडाऊन-५ पर्यंत लातूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या नगण्य होती. १ जून रोजी अ‍ॅनलॉक-१ सुरु झाले आणि गेल्या २५-२६ दिवसांत शहरातील पॉझिटिव्ह व्यक्तींची एकुण संख्या २६६ पर्यंत गेली़ यातील १८६ व्यक्ति बरे होऊन घरी गेले असले तरी अ‍ॅक्टीव व्यक्तींची संख्या ६५ तर मृत्यू झालेल्यांची संख्या १५ इतकी झाली आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

कंटेन्मेंंट झोनचीही संख्या वाढत आहे़

बाधितांची संख्या वाढत आहे तसे कंटेन्मेंंट झोनचीही संख्या वाढत आहे़ सध्या लातूर शहरामध्ये प्रकाशनगर,चंद्रोदय कॉलनी, मोतीनगर, अजिंक्य सिटी, कैलासनगर, माताजीनगर, सुतमिलरोड, भोई गल्ली, शेट्टेगल्ली, कोल्हेनगर, श्रीकृष्णनगर, बाबानगर, कपीलनगर, सौभाग्यनगर आदी जवळपास २७-२८ नगरांचा समावेश आहे़ जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यात एकुण ९० कंटेन्मेंट झोन आहेत. त्यापैकी ४३ कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध उठविण्यात आले आहेत. सध्या ४७ कंटेन्मेंट झोन आहेत.

११ बाधित रुग्ण आढळले त्यातील ५ रुग्ण कुरेशी गल्लीतील

शनिवारी शहरात ११ बाधित रुग्ण आढळले़ त्यातील ५ रुग्ण कुरेशी गल्लीतील आहेत़ त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने कुरेशीगल्ली तात्काळ सील करुन सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करुन संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरु करण्यात आली़ दरम्यान विभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी सदर कंटेन्मेंट झोनला भेट देऊन पाहणी केली़ यावेळी महानगर पालिकेचे झोन ‘डी’ चे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, स्वच्छता निरीक्षक अमजद शेख, बालाजी कोंबडे, प्रदिप खंदाडे, समीर शेख यांनी संपुर्ण परिसर सील करण्यात सहकार्य केले़

अधिक सावधानतेची गरज

दिवसेंदिवस बाधिकांची संख्या वाढत चालली आहे़ रुग्ण वाढत असल्याने कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढत आहे़ कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी करणे आवश्यक आहे़ लातूर शहरात शुक्रवारी ९ तर शनिवारी ११ बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ ही संख्या पाहता आता अधिक सावधानतेची गरज आहे.

Read More  ५० वर्षांवरील व्यक्तींची होणार स्क्रिनिंग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या