22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरबेताल पीआय बकालेला बडतर्फ करा

बेताल पीआय बकालेला बडतर्फ करा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मराठा समाजाविरुद्ध अश्लिल भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा जळगाव येथील पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याला तत्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करुन मराठा बांधव निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन सादर करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पीएसआय किरणकुमार बकाले याने फोनवर बोलत असताना मराठा समाजाबद्दल केलेले विधान निषेधार्य असून यामुळे मराठा समाजाच्या भावनांना ठेच पोहचली आहे. हे वक्तव्य सामाजीक सौहार्द बिघडवणारे आहे. शासनाने निलंबन व चौकशीच्या फे-यात न अडकता शासकीय सेवेतून बकालेला तत्काळ बडतर्फ करावे.

पीआय बकाले मोबाईलवर बोलत असताना त्याच्या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थन करणारा पोलिस कर्मचारी वा कोणीही असेल तर त्याच्यावरही अशीच कार्यवाही करावी, ती न केल्यास समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मराठा बांधवांचे म्हणणे ऐकून घेतले. निवेदन दिल्यानंतर बार्शी रोडवर समाजबांधवांनी किरण बकालेच्या वक्तव्याचा निषेध करीत त्याच्या प्रतिमेस जोडे मारले.

लातुरातही गुन्हा दाखल करा
किरणकुमार बकालेच्या विरोधात मराठा समाजांच्या वतीने दि. १५ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अजुनही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला नाही. व्यक्ती कुठलीही असेल व त्याने आक्षेपार्ह कृत्य केल्यामुळे एखाद्याने त्याच्याविरुध्द फिर्याद दिली असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो हा पूर्वइतिहास असून दिलेल्या तक्रारीवरुन दोन दिवसांत बकाले विरुध्द गुन्हा दाखल करावा अन्यथा समाज रस्त्यावर उतरेल असाही इशारा यावेळी देण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या