23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरलातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या पम्पिंग स्टेशन मध्ये बिघाड, शहराचा पाणीपुरवठा...

लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या पम्पिंग स्टेशन मध्ये बिघाड, शहराचा पाणीपुरवठा खंडित

एकमत ऑनलाईन

कळंब : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पंपिंग स्टेशन येथील सब स्टेशनमधील बिघाडामुळे लातूर शहराचा पाणी पुरवठा तीन दिवसांपासून खंडित झाला आहे, दुरुस्ती काम 10 सप्टेंबर पासून अजूनही सुरू आहे. आज रविवार दि.12 सप्टेंबर असल्याने दुरुस्तीचे काम ठप्प होते. अशी माहिती धरणावरील कर्मचाऱ्याने दिली आहे.

दिनांक 10 सप्टेंबर रोजी धनेगाव सब स्टेशन मधील फायबर सीट व सिटी बस्ट झाल्यामुळे दुरुस्ती करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजता ट्रायल घेत असता परत दुसरे फायबर शीट व सिटी बस्ट झाले आहे. त्याचेही दुरुस्तीचे काम अजून झालेले नाही. लवकरच दुरुस्ती कामे पूर्ण होतील. पाणी उपसा प्रारंभ होताच शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल.

ऑक्टोबरअखेर मुलांसाठी मिळणार फायझर इंक लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या