27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरखाजगी शाळेतही ‘बाला’ साठी जि. प. पुढाकार घेईल

खाजगी शाळेतही ‘बाला’ साठी जि. प. पुढाकार घेईल

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘बाला’ उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले जात आहेत. निपूण भारत, वृक्ष लागवड, हर घर झेंडा या उपक्रमाविषयी माहिती देवून ‘बाला’ या उपक्रमाची पीपीटीद्वारे माहिती देवून जनजागृती करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत जिल्हा परिषद शाळेप्रमाणे खाजगी शाळामध्येही ‘बाला’ उपक्रम राबविण्याची शाळांची इच्छा असेल तर त्यासाठी लातूर जिल्हा परिषद सक्रियपणे पुढाकार घेईल, असे प्रतिपादन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्­त विद्यमाने जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय एमआयडीसी येथील सभागृहात लातूर जिल्ह्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या गुणवत्ता आढावा व सहविचार सभेत ते बोलत होते. यावेळी विभागिय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गिरी, सहायक उपसंचालक दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, डॉ. भागिरथी गिरी, उपशिक्षणाधिकारी भगवान फुलारी, विशाल दशवंत, डॉ. शंकर चामे, रूपाली मुधोळकर, गोविंद शिंदे, संजय बिराजदार, ईस्माइल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कव्हेकर म्हणाले की, जिल्हा परिषद शाळाबरोबरच खाजगी शाळेची गुणवत्ता वाढवायची असेल तर मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्यामध्ये सुसंवाद घडायला हवा. यासाठी शासनाने त्यांना योग्य ते सहकार्य करायला हवे, शिवाय अभ्यासक्रमात अध्यात्म हा विषय आणून विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणि सर्जनशीलता निर्माण करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी केले. सूत्रसंचालन अब्दूल गालीब शेख यांनी केले तर आभार ईस्माईल शेख यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या