25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरजि. प. अधिकारी, कर्मचारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय

जि. प. अधिकारी, कर्मचारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय

एकमत ऑनलाईन

लातूर : कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीत सर्वजन आपापल्यापरिणे सहकार्यासाठी पुढे येत आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारीही मदतीसाठी सरसावले आहेत. एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या दुस-या लाटेने लातूर जिल्हा प्रभावित झाला असून हा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे दररोज १५०० ते २००० रुग्ण कोरोना बाधित होत असताना या सर्व बाधित रुग्णांना आरोग्याशी संबंधित सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना प्रशासकीय यंत्रणा अक्षरश: हतबल झाले असून रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड याची प्रचंड मोठया प्रमाणात कमतरता जाणवत आहे.

तेव्हा सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनेने मदतीसाठी पुढे यावे असे आवहान लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले होते या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी संघटना व शिक्षक संघटनेची एक बैठक घेण्यात आली.या बैठकीत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच शिक्षक संघटनेने एक दिवसाचे वेतन या आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणुन निधी संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यात जिल्हा परिषद वर्ग १ ते वर्ग ४ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन जवळपास २ कोटी रूपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आली. या जमलेल्या निधीतून कोरोना बाधित रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना करणे, तसेच जिल्हा परिषद अंतर्गत बाधित कर्मचा-यांवर वैद्यकिय उपचार करणे, तसेच या रोगाच्या प्रादुर्भावाने दुर्दैवाने मृत झालेल्या जि. प. कर्मचा-यांच्या कुंटूबियास मदत करणे या कामी हा निधी वापरण्यात येणार आहे यापुर्वीही लातूर जि. प. कर्मचा-यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी व कुपोषणग्रस्तासाठीही १ दिवसाचे वेतन मदत म्हणून देऊ केलेली आहे. काल झालेल्या या बैठकीला जि. प. अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना अनुदानापासून लाखो कामगार वंचित राहणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या