निलंगा : माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संभाजीराव पाटील व भाजपाचे प्रदेश सचिव अरंिवंद पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून राजे संभाजी शेतकरी बचत बोटकुळ व रामलिँगेश्वर फर्टीलायझर निलंगा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बोटकुळ येथील शेतक-याना बांधावर १२ ३२ १६ जय किसान कँपनीच्या २०० पोत्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी चोले यांचे सहकार्य लाभले, गटाचे अध्यक्ष सरपंच बालाजी मोरे, ज्ञानेश्वर मोरे, उपसरपँच सुरेश मोरे, रमेश मोरे, माधव मोरे, राजू मोरे, कुशेंद्रकुमार मोरे, मदन मोरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.