20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeलातूरपालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मदतीचे वाटप

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मदतीचे वाटप

एकमत ऑनलाईन

लातूर : नैसर्गिक आपत्तीमुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटींबियांना मदतीचे वाटप दि. ३१ जुलै रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोविड-१९ आढावा बैठकीच्या वेळी करण्यात आले.

आकांक्षा रमेश काळे, माऊली राम पवार, काकासाहेब गोरोबा भंडे आणि मारोती सिदराम कांबळे याच्या कूटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदतनिधीचे धनादेश पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते अदा करण्यात आले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे,मनपा आयुक्त अमन मित्तल, मनपातील विरोधीपक्ष नेते अ‍ॅड. दीपक सूड आदी उपस्थित होते.

नैर्सगीक आपत्तीमुळे मृत्यु पावलेल्या लातूर आणि परीसरातील व्यक्तीच्या कुंटूबियांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. संकटात आणि अडचणीच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाण्यात राज्य शासन तत्पर आहे. तेंव्हा जिल्हास्तरावरील यंत्रणांनी सजग राहून आपत्तीमध्ये कोणाचाही मृत्यू होणार नाही किंवा इतर नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. नियतीच्यापुढे माणूस हतबल असतो परंतू आपत्ती येण्यापूर्वी आपल्याला सावधानतेचा इशारा मिळतो. वेळीच उपाय योजना करणे आपल्या हातात आहे. नागरिकांच्या जीवनाची रक्षा करणे प्रशासनाचा कर्तव्य आहे.

जीर्ण झालेल्या इमारती आणि झाडांमुळे लोकांचे जीव जाणे अतिशय दुखद आहे.घरातल्या माणसाची अचानक मृत्यु असहनीय असते. जिल्हा प्रशसन आपल्या दुखात आपल्या बरोबर आहे. यावेळी मृतांच्या आतम्यास शांती वाहन्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोविड-१९ आढावा बैठकीसाठी उपस्थित सर्व अधिका-यांनी उभे राहुन श्रध्दांजली वाहिली.

जीर्ण इमारती व झाडांचा शोध घ्यावा
महानगरपालिकेने शहरातील जीर्ण झालेल्या इमारती आणि झाडांचा शोध लावून उचित कार्यवाही करावी. तसेच जिल्हाधिकारी यांनी विजरोधक यंत्रांचा जाळा उभा करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

पालकमंत्र्यांनी घेतला कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा आढावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या