लातूर : प्रतिनिधी
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दगावलेले लातूर तालुक्यातील बोकनगाव येथील शेतकरी मधुकर बळीराम दाताळ यांच्या कुटुंबीयास वन विभागाने एकूण १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. या अर्थसहाय्याचा धनादेश लातूर येथील तहसील कार्यालय येथे श्रीमती गोदावरी मधुकर दाताळ यांना आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. जुलै २०२२ मध्ये रानडुक्कर या वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी मधुकर बळीराम दाताळ यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांना सोमवारी अर्थसहाय्य करण्यात आले.
यावेळी लातूर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, तहसीलदार स्वप्नील पवार, लातूरचे वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी निलेश बिराजदार, काँग्रेस पक्षाचे जिल्हा समन्वयक सचिन दाताळ, राजेसाहेब सवई, बादल शेख, संचालक अनुप शेळके, नायब तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार श्रावण उगले, काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, बंडू शिंदे, दयानंद स्वामी, उपसरपंच किशोर दाताळ, गणपत दाताळ, बालाजी वाघमारे, राहूल गरड, अभिमान भोळे, दगडू कांबळे आदी उपस्थित होते.