21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeलातूरनिलंग्यात २५ कुटुंबियांना धान्य किटचे वाटप

निलंग्यात २५ कुटुंबियांना धान्य किटचे वाटप

एकमत ऑनलाईन

निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना महामारीमध्ये उपासमारी होत असलेल्या पालावरील २५ कुटुंबीयांना तहसीलदार गणेश जाधव यांच्या हस्ते धान्याचे किट वाटप करण्यात आले. कोरोना महामारी मध्ये हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे . त्यातच ज्या कुटुंबाचे नाव अन्नधान्य योजनेमध्ये समाविष्ट नाही अशा कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी व जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि ३१ मे रोजी निलंगा तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने पालावर राहणा-या अशा २५ कुटुंबांना येथील तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश जाधव यांच्या हस्ते अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. या अन्नधान्य किटामध्ये ५ किलो गव्हाचे पीठ, पाच किलो तांदूळ, दोन किलो हरभरा डाळ ,दोन किलो तूर डाळ , दोन किलो मुग डाळ , एक किलो मिरची पावडर ,चहापत्ती पुडा आदी धान्याचा यात समावेश आहे.

निलंगा तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत पालावरील कुटुंबांना अन्न धान्याचे कीट वाटप केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अरुण महापुरे, रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष मारुती गायकवाड, श्रीमंत मेहकरे, दिनकर बनसोडे, कालिदास रेड्डी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण शिंदे , बालाजी शिंदे, संतोष धुमाळ, अशोक कोराळे ,श्रीमंत क्षीरसागर, बगाटे कोळी आदींनी परिश्रम घेतले.

२०० कुटुबीयांना किटचे वाटप करण्यात येणार
निलंगा तालुक्यामध्ये १९५ रास्तभाव दुकानदारा आहेत. कोरोना महामारीमुळे हाताला काम नाही तसेच अन्नधन्य योजनेच्या यादीत नाव समाविष्ट नसल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून या कुटुंबांना आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिका-यांच्या सुचनेवरून तहसीलदार गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अन्नधान्याच्या लाभार्थ्यांच्या यादीत नाव नसलेल्या पालावरील व वस्तीवरील २०० कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येणार आहेत. त्यातील प्रातिनिधिक स्वरूपात पालावरील २५ कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले असल्याचे निलंगा तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील यांनी सांगितले.

जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवरती कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या