जळकोट : तालुक्यामध्ये आत्मा अंतर्गत स्थापित शेतकरी महिला गटांना पोषण आहार परसबाग साठी भाजीपाला बियाण्याचे वाटप करण्यात आले. महाबीजचे दहा ग्राम वजनाचे दहा प्रकारचे परसबागेसाठी उपयोगात येणारे भाजीपाला बियाणे मिनी किट तालुक्यातील आत्माअंतर्गतस्थापित विविध गावातील शेतकरी महिला गटांना वाटप करण्यात आले. सदरील भाजीपाला बियाणे मिनी कीटमध्ये मेथी, पालक, कारले, कोंिथबीर, भेंडी, काकडी, राजमा, दोडका इत्यादी प्रकारचे भाजीपाला बियाणे उपलब्ध आहेत. प्रकल्प संचालक आत्मा लातूर कार्यालयामार्फत सदर बियाणे प्रकल्प संचालक आत्मा लातूर कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याची विक्री ग्राहकापर्यंत करण्यात येणार असल्याचे उपस्थित महिला शेतकरी गटाचे अध्यक्ष श्रीमती सुचिता मरेवाड यांनी सांगितले. तसेच शेतकरी महिलांचे आर्थिक सबलीकरण होणार असल्याचे मत उपस्थित महिला शेतक-यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळ कृषी अधिकारी श्री अनिल गीते कृषी पर्यवेक्षक नानासाहेब धुपे कृषी पर्यवेक्षक ज्ञानोबा हंगरगे आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाश क्षीरसागर, कृषी सहाय्यक श्रीमती स्वाती भालके यांच्यासह उपस्थितीत शेतकरी महिला गटांना भाजीपाला बियाणे मिनी किटचे वाटप करण्यात आले.