24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरपीेककर्ज वाटपात जिल्हा बँक अव्वल

पीेककर्ज वाटपात जिल्हा बँक अव्वल

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांना खरीप हंगामात बी-बियाणे, खते व मशागतीसाठी पीककर्ज वाटप करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने देणत आले आहेत. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणा-या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्ह्यातील शेतक-यांना पीककर्ज वाटपात अव्वल आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँका पीककर्ज वाटपात उदसीनता दाखवत असल्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने अ‍ॅक्शनमोडवर येण्याची गरज आहे.

राज्य शासनाच्या वतीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बँकेला ७४५ कोटी ८१ लाख ४१ हजार, व्यापारी बँकांना १ हजार कोटी ४० लाख तर लातूर ग्रामीण बँकेला २१४ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लातूर जिल्हा बँक विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सक्षमपणे चालते. बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व संचालक मंडळ तथा कार्यकारी संचालक यांच्या सहकार्याने बँकेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.

मागील वर्षी परतीच्या पावसाने पावसाने पीक गेले. यंदा पेरणीसाठी उसनवारी करावी लागली. जिल्हा बॅँक वगळता इतर बँकांकडून पीककर्जाला प्रतिसाद मिळत नाही. निसर्गाच्या संकटामुळे शेतीतून अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. त्यावर मुलांचे शिक्षण, आरोग्य, इतर जीवनावश्यक गरजा भागवता भावता शेतक-यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने पीककर्ज वाटपाबाबत अ‍ॅक्शनमोडवर येण्याची खरी गरज आहे.

जिल्हा बँकेकडून आतापर्यंत ५६ टक्के कर्जवाटप
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राज्यातील काही चांगल्या बँकामध्ये समावेश होतो. जिल्ह्यातील शेतक-यांच्या मदतीला कायम धावारी बँक, असा या बँकेचा नावलौकीक आहे. सर्वाधिक सभासदही याच बँकेचे आहेत. आतापर्यंत या बँकेने ५६ टक्के पीककर्ज वितरीत केले आहे. या तुलनेत व्यापारी बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या १३.७१ टक्के, ग्रामीण बँकेने उद्दिष्टाच्या ४८.२५ टक्के पीककर्ज वाटप केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या