लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण बँकेने स्वीकारले आहे. शेतकरी सभासद यांना मदतीसाठी सदैव तत्पर सेवा देत आहे. सर्वसामान्य शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्याची भूमिका घेतली असून सर्वांना सोबत घेऊन बँकेची दैदिप्यमान वाटचाल सुरु आहे, अशी माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना दिली.
मंगळवारी औसा तालुक्यातील मातोळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अॅड. श्रीपतराव काकडे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, माजी व्हाईस चेअरमन उदयसिंह देशमुख, जिल्हा काँग्रेस समन्वयक सचिन दाताळ औसा बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, मांतोळा सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष व्यंकट भोसले, व्हॉईस चेअरमन गणेश भोसले, विक्रम भोसले, संजय भोसले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, बबन आनंदगावकर, संतोष आनंदगावकर, हणमंत भोसले, धनंजय भोसले, रणजित सूर्यवंशी, शेषराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.