26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरजिल्हास्तरीय आदर्श उपक्रमशील शाळा ‘ श्री केशवराज’ पुरस्काराने सन्मानित

जिल्हास्तरीय आदर्श उपक्रमशील शाळा ‘ श्री केशवराज’ पुरस्काराने सन्मानित

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श उपक्रमशील शाळा या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते श्री केशवीराज प्राथमिक विद्यालयास सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किरण भावठाणकर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकरराव शृंगारे होते.

या सोबतच व्यासपीठावर माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मापारी, भाजप प्रवक्त्या प्रेरणा होनराव व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी या सर्वांची उपस्थिती लाभली होती. मुख्याध्यापक हेंडगे यांचा नावीन्यतेचा ध्यास व सर्व शिक्षक यांचे अथक परिश्रम, उत्साही विद्यार्थी व पालक या सर्वांच्या सातत्यपूर्ण केलेल्या उपक्रमामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आणि अभिमान आहे.

हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे व सर्व शिक्षक सहका-यांच्या हस्ते स्विकारण्यात आला. या पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे शाळेच्या सर्व मान्यवर पदाधिकारी व परिसरातून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या