22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरजिल्हास्तरीय सामन्यांना लातूर येथे आजपासून सुरुवात

जिल्हास्तरीय सामन्यांना लातूर येथे आजपासून सुरुवात

एकमत ऑनलाईन

लातूर : लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण टी १०’ स्पर्धेचे जिल्हास्तरीय सामने २३ व २४ मे रोजी होणार असून २५ मे रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे अंतिम सामना रंगणार आहे. जिल्हाभरात खेळल्या गेलेल्या ४०० तालुकास्तरीय संघातून ११ संघांची जिल्हास्तरीय सामन्यासाठी निवड झाली आहे.

खेळाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने लाaतूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यात लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गाव, तांडा वस्तीतील खेळाडू, संघांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. ४०० संघ तालुकास्तरीय स्पर्धेत एकमेकांशी भिडले. यातील सांघिक कामगिरीच्या जोरावर प्रत्येक तालुक्यातून एक असे लातूर शहरासह ११ संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

या तालुकास्तरीय विजयी संघांना रोख ५१ हजार रुपये, द्वितीय संघाला ३१ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व सामनावीर यांना प्रत्येकी ३ हजार रुपये सन्मानचिन्ह देण्यात आले. जिल्हास्तरीय सामन्यातील विजयी संघाला १ लाख, द्वितीय येणा-या संघाला ५१ हजार तर तृतीय येणा-या संघाला ३१ हजार रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व सामनावीर यांनाही प्रोत्साहनपर रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेतील पहिला सामना २३ मे रोजी अहमदपूर विरुद्ध निलंगा यांच्यात तर दुसरा सामना जळकोट विरुद्ध चाकूर, तिसरा सामना लातूर विरुद्ध उदगीर यांच्यात तर चौथा सामना रेणापूर विरुद्ध देवणी यांच्यात होणार आहे. २४ मे रोजी लातूर शहर, औसा, शिरुर अनंतपाळ यांचा सामना २३ मे रोजीच्या विजयी संघांशी होणार आहे. २५ मे रोजी अंतिम सामना होणार आहे. सर्व सामने दररोज दुपारी ४ ते रात्री ९.३० वाजेदरम्यान लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेला क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या