27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूर१९ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

१९ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

एकमत ऑनलाईन

लातूर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक पुरस्काराचे वितरण होते. या अनुशंगाने लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने २०२१-२२ या वर्षीचे उत्कृष्ट १९ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. सदर पुरस्काराचे वितरण दि. ५ सप्टेंबर रोजी होते. मात्र यावर्षी महालक्ष्मीचा सण असल्याने पुरस्कार वितरण लवकरच होणार आहे.

लातूर जिल्ह्यातील शिक्षकांना दरवर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने सन्मानीत करण्यात येते. यावर्षी १० प्राथमिक शिक्षकांची व ८ माध्यमिक शिक्षकांची, तर कला, साहित्य, दिव्यांग मधून एक शिक्षकाचे प्रस्ताव जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी आले होते. जिल्हा पुरस्कारासाठी ज्या शिक्षकांनी आपले अर्ज सादर केले होते. ८० पैकी गुणांच्या प्रस्तावाची तपासणी विस्तार अधिकारी स्तरावर करण्यात आली. या तपसणीत शिक्षकांना ८० पैकी गुण वितरण करण्यात आले. तसेच याच शिक्षकांनी २० गुणांसाठी आपण केलेल्या कार्याची पीपीटी मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे सादर केली होती. अशा प्रकारे १९ शिक्षकांची १०० गुणांची चाचणी घेण्यात आली. या उत्कृष्ट १९ शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा पुरस्कारासाठी विभागीय आयुक्तांच्याकडे पाठवण्यात आले होते. या उत्कृष्ट १९ शिक्षकांच्या यादीला शुक्रवारी विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

या पुरस्कारामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचे लातूर तालुक्यातील रायवाडी जि. प. शाळेच्या आरती कांबळे, औसा तालुक्यातील करजगाव जि. प. शाळेचे नयुम सय्यद, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ जि. प. शाळेचे संतोष सुतार, उदगीर तालुक्यातील देवर्जन जि. प. शाळेचे जनार्धन जाधव, अहमदपूर तालुक्यातील रूई जि. प. शाळेतील सुर्यकांत बोईनवाड, जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा जि. प. शाळेचे धोंडिबा पवार, रेणापूर तालुक्यातील सेलू जि. प शाळेचे दत्तात्रय इगे, देवणी येथील जि. प. शाळेचे बस्वराज बिराजदार, तर चाकूर तालुक्यातील अजनसोंडा जि. प. शाळेचे देवीदास माने यांचा तर माध्यमिक शिक्षण विभागातील देवणी तालुक्यातील जवळगा जि. प. शाळेचे सरेंद्र चौहान, अहमदपूर येथील जि. प. शाळेचे नागनाथ कदम, निलंगा येथील जि. प. शाळेच्या वर्षाराणी शेरे, उदगीर तालुक्यातील दावणगाव येथील जि. प. शाळेच्या आरती मलशेटवार, जळकोट येथील जि. प. शाळेचे माधव वाघमारे, चाकूर तालुक्यातील नळेगाव जि. प. शाळेचे नितीन माशाळकर, रेणापूर तालुक्यातील मोटेगाव जि. प. शाळेचे गोकूळ देवर्षे, तर औसा तालुक्यातील नागरसोगा जि. प शाळेच्या माधूरी भुरे यांना, तसेच कला, क्रिडा, दिव्यांग कोट्यातून निलंगा तालुक्यातील सावरी जि. प. कें. शाळेचे शिवाजी जाधव यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या