27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरखंडणीला वैतागून डॉक्टरची आत्महत्या

खंडणीला वैतागून डॉक्टरची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

उदगीर : बनावट रेमडिसिविर इंजेक्शन प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अर्ज मागे घेण्यासाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागून खडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी डॉ. नामदेव गिरी यांना देण्यात आली होती, त्या तणावाला वैतागून खेर्डा तालुका उदगीर येथील डॉ. नामदेव गिरी या डॉक्टराने आत्महत्या केल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे़ याप्रकरणी मयत डॉक्टरच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून वाढवणा पोलीस ठाणे येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या दुस-या लाटेमध्ये उदगीर येथील महेशकुमार यांनीची आई शांताबाई त्रिंबकराव जीवने या आजारी असल्याने शहरातील उदयगिरिमल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केले होते.

उपचारादरम्यान शांताबाई जीवने यांचा मृत्यू झाला. यावेळी महेशकुमार जीवने यांनी जुलै २०२१ मध्ये उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करुन उपचारादरम्यान त्यांच्या मातोश्रीना डॉ. नामदेव गिरी व डॉ. माधव चंबुले यांनी संगनमत करून उपचारासाठी बनावट नकली भेसळयुक्त रेमडिसिविर इंजेक्शन देऊन हे इंजेक्शन खरे आहे असे भासवून ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी डॉ. माधव चंबुले व डॉ. नामदेव गिरी या दोघांविरोधात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉ. नामदेव गिरी यांच्या विरोधात दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी त्या गुन्ह्यातील फिर्यादी महेशकुमार जीवने ूयांनी डॉ. नामदेव गिरी यांना दीड कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी करीत होते. खंडणीची रक्कम नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मानसिक त्रास देण्यात आला, अशी तक्रार डॉ. गिरी यांच्या पत्नी सुनंदा गिरी यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिली आहे.

आरोपीच्या मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. नामदेव गिरी यांनी २५ मे २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ६.३० वाजायच्या दरम्यान खेर्डा तालुका उदगीर येथील त्यांच्या राहत्या घरी शेतातील पिकावर फवारणीचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी दि ३१ मे रोजी डॉ. गिरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या