23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरडॉक्टरांनी केला नव तंत्रज्ञानाचा अविष्कार ; जुळ्यांसह पॅपराशिअस बाळाचा जन्म

डॉक्टरांनी केला नव तंत्रज्ञानाचा अविष्कार ; जुळ्यांसह पॅपराशिअस बाळाचा जन्म

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील के. जी. एन. टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटलमध्ये नवीन तंत्राचा वापर करुन एका निपुत्रिक दाम्पत्यास तिळेची गर्भप्राप्ती झाली आणि प्रसुतीनंतर जुळे व एक पॅपराशिअस बाळ जन्माला आल्याची माहिती हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. अमीर शेख व डॉ. रझिया शेख यांनी दिली.

सदर निपुत्रिक दाम्पत्यास ९ वर्षे आपत्त्यप्राप्ती होत नव्हती. प्राथमिक तपासण्या करुन आय. व्ही. एफ. ने त्यांना तिळे बाळांची गर्भप्राप्ती झाली. पण, या स्त्री रुग्णाचे गर्भाशय तीन बाळांना वाढविण्याएवढे कार्यशील नव्हते. त्यामुळे एक भ्रुणचे एम्ब्रियो रिडक्शन करण्यात आले. एम्ब्रियो रिडक्शन म्हणजे त्या भ्रुणाची वाढ गर्भाशयातच बंद करण्यात येते. बाकीचे इतर बाळ नऊ महिन्यांपर्यंत आपोआप वाढत जातात. मराठवाड्यामध्ये के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटल येथे एम्ब्रियो रिडक्शनची सुविधा उपलब्ध आहे. गर्भवती महिलेची वारंवार सोनोग्राफ्री व रक्त तपासणीद्वारे जुळ्या बाळांची व्यवस्थित वाढ करण्यात आली. सोबतचे तिसरे भ्रुण तिथेच वाळविण्यात यश येत गेले. हे भ्रुण कागदासारखे चपटे पातळ अवस्थेत वाळत जाते म्हणून याला पॅपराशिअस बेबी म्हणतात.

सदरील महिलेची प्रसुती शस्त्रक्रियाद्वारे योग्य वेळ बघून डॉ. अमीर शेख व टीमने केली. यावेळी एक मुलगा, एक मुलगी आणि तिसरे पॅपराशिअस बेबी जन्माला आले. महणजेच हे पॅपराशिअस बेबी या दोन्ही बाळांबरोबर भू्रण तयार केल्यापासून ते प्रसुतीपर्यंत म्हणजे ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’, सोबत होते. डॉ. अमीर शेख यांच्या या कार्यात डॉ. पाटील, डॉ. अतीख, डॉ. कदम, डॉ. विशाल मैंदरकर, डॉ. देशमुख आदींचे मोलाचे सहकार्य मिळाले.

वन्यप्राण्यांच्या उद्रेकाने गावकरी त्रस्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या