23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरअवयवदानासाठी डॉक्टरांनी पुढे यावे

अवयवदानासाठी डॉक्टरांनी पुढे यावे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अवयवदानाविषयी समाजात जागृती करण्यासाठी आता डॉक्टर मंडळींने पुढे येण्याची गरज आहे. डॉक्टर अवयवदान करतात हा संदेश लोकांच्या मनावर जितका प्रभाव पाडू शकतो तितका प्रभाव फक्त या विषयावर मार्गदर्शन करुन किंवा यासाठी आवाहन करुन पाडता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त डॉक्टरांनी अवयवदानाचा विहीत नमुन्यातील अर्ज भरावा व जे रुग्ण इच्छुक असतील त्यांचा अर्ज भरुन घ्यावा, असे आवाहन ‘आयएमए’, लातूरच्या वतीने डॉ. कल्याण बरमदे व डॉ. मुकूंद भिसे यांनी केले आहे.

अवयवदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे डॉक्टर म्हणून आपण सर्वजण जाणतो. भारतात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा अवयव न मिळाल्याने मृत्यू होतो. एकेका अवयवसाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य कंठणा-यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्यांची संख्या वाढतच आहे. अवयवदानातून हे मृत्यू टाळता येऊ शकतात. अवयवदान करण्यासाठी नोंदणी करणे ही एक साधी सोपी प्रक्रिया आहे. तरीपण आपल्या देशात अवयवदान हे फार कमी प्रमाणात होते. भारतात दहा लाखामागे केवळ दोन व्यक्ती अवयवदान करणा-या आहेत. हे इतकेकमी प्रमाण असण्याचे कारण अवयव दानाचे महत्त्व न समजणे आणि त्याबद्दल असणारे गैरसमज हे असू शकतात. त्यामुळे अवयव दानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी संपूर्ण डॉक्टरांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आपण डॉक्टरांनी स्वत: अवयवदानामध्ये जास्त संख्येने सहभागी होऊन समाजासमोर उदाहरण ठेवले तर समाजातील विविध घटकांना अवयवदान करण्यासाठी आपण अधिक प्रमाणात प्रोत्साहित करु शकतो. डॉक्टर अवयवदान करतात हा संदेश लोकांच्या मनावर जितका प्रभाव पाडू शकतो तितका प्रभाव फक्त या विषयावर मार्गदर्शन करुन किंवा यासाठी आवाहन करुन पाडता येणार नाही, असे आम्हाला मनोमन वाटते. म्हणून आयएमए लातूरच्या वतीने सर्व सदस्यांना आम्ही आवाहन करत आहोत की आपण जास्तीत प्रमाणात अवयवदानाचा विहीत नमुन्यातील अर्ज भरावा व जे रुग्ण इच्छुक असतील त्यांचा अर्ज भरुन घ्यावा, असेही डॉ. बरमदे व डॉ. भिसे यांनी नमुद केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या