25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरडॉक्टरांनी घेतला आर्थिक साक्षरतेचा मंत्र

डॉक्टरांनी घेतला आर्थिक साक्षरतेचा मंत्र

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
व्यवसाय व उतपन्नाला आर्थिक साक्षरतेची जोड मिळाल्यास त्यातून लाभलेली आर्थिक शिस्त व स्वावलंबन अधिक फायदेशीर ठरत असते हे ओळखून येथील आयएमए वुमन्स ंिवगच्या वतीने महिला डॉक्टरांसाठी घेण्यात आलेल्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेस डॉक्टरांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

अध्यक्षस्थानी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय ओव्हळ होते. सीपीएस मूबंईचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर, उपअधिष्ठाता डॉ. मंगेश सेलुकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते डॉ. ज्ञानेश्वरा के. बी व प्रदीप तावडे यांनी आर्थिक व्यव्हार, गुतवणूक, गुंतवणुकीचे पर्याय फसव्या योजनेपासून सावधानता, आर्थिक नियोजन याबाबत विस्ताराने माहिती तसेच उपस्थितांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांना उत्तरे दिली. आयएमए वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी राऊत यांनी आर्थिक नियोजनाबाबत आर्थिक साक्षरता गरजेची असताना अनेक उच्चशिक्षीत महिला स्वताचे आर्थिक नियोजन घरातील पुरुष अथवा एजंटावर सोपवतात. हे अज्ञान दूर व्हावे, त्यांनाही वीमा,
शेअर मार्केट, योग्य गुंतवणूक, करभरणा, म्यूचवल फंड आंिदची माहिती मिळावी या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

विंगच्या सचिव डॉ. श्वेता काटकर यांनी आप आपल्या क्षेत्रात अग्रेसर ब-याच महिला आर्थिक नियोजनाबाबत फारशा दक्ष रहात नाहीत. त्यांनी याबाबतची माहिती घेतली तर ती त्यांच्या आर्थिक नियोजन अन उन्नतीसाठी फायद्याची ठरते. चुकीच्या फसव्या योजनांपासून होणारे त्यांचे संभाव्य नुकसान टळू शकते नेमके हे साध्य करणे हा कार्यशाळेमागचा उद्देश होता असे सांगितले. डॉ. ओव्हळ यांनी कार्यशाळा आयोजनाबाबत ंिवगचे कौतूक केले. शंभर पेक्षा अधिक महिला डॉक्टर्स या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या