25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home लातूर मुरुड येथील डॉक्टरांचा वृक्षलागवड संगोपनाचा उपक्रम

मुरुड येथील डॉक्टरांचा वृक्षलागवड संगोपनाचा उपक्रम

एकमत ऑनलाईन

मुरुड : कोरोनाच्या काळात कोविड योद्धा म्हणून काम केलेले डॉक्टर मंडळी सामाजिक कार्यातही पुढाकार घेत असून मुरुड शहरातील सामाजिक भान असणाºया २५ डॉक्टर्सनी एकत्र येऊन वृक्षारोपण व संगोपनचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत मुरुड बसस्थानक ते आंबेडकर चौक या मार्गांवरील शासकीय कार्यालया समोरील बाजूस ३ वर्ष वयाची मोठी झाडे लावण्यात आली. ‘एक डॉक्टर, एक झाड, ही नावीन्यपूर्ण संकल्पना या डॉक्टरांकडून राबविण्यात येत आहे. यानुसार वृक्ष रोपण व वृक्ष संवर्धन केले जात आहे.

यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक डॉक्टरांनी एक झाड दत्तक घेतले असून या झाडांना वर्षभर लागणारे पाणी, निगराणी, झाडा शेजारील परिसराची स्वच्छता इत्यादींची हमी प्रत्येक डॉक्टरने घेतली आहे. तसेच येणाºया काळात या डॉक्टरांकडून झाडांची भिसी चालू करून या उपक्रमाला व्यापक स्वरूप देऊन पर्यावरण व सुशोभीकरण हे दोन्ही उद्देश हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे. या उपक्रमाला गावचे सरपंच अभय नाडे व उपसरपंच आकाश कणसे यांनी सहकार्य केले अशी माहिती डॉ़ बजरंग खडबडे व डॉ़ नितीन ठाकूर यांनी यावेळी दिली.

अशा प्रकारे ग्रामीण भागातील २५ डॉक्टरांनी एकत्र येऊन असा अभिनव उपक्रम राबविल्याने गावातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. अशा उपक्रमामुळे गावातील परिसर स्वच्छ, सुंदर व निरोगी होईल. गावातील व्यापारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन एक व्यक्ती एक झाड यासारखा उपक्रम राबविण्यास ग्रामपंचायत मुरुड सर्वांना सहकार्य करेल, अशी ग्वाही उपसरपंच आकाश कणसे यांनी यावेळी दिली.

या अभिनव उपक्रमात मुरुड येथील डॉ.अमरचंद छल्लानी, डॉ. सूर्यकांत तोष्नीवाल, डॉ. उमाकांत झाडके, डॉ. हनुमानदास चांडक, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सतीश भारती, डॉ. बी़ बी़ बाहेती, डॉ. आऱ बी़ बाहेती, डॉ. सुरेश रणदिवे, डॉ. संतोष गोसावी, डॉ. रवींद्र लोमटे, डॉ. नागेश पाटील, डॉ. सलीम पठाण,डॉ विकास काळे, डॉ. कमलदीप कासार, डॉ़ विजय पुरी, डॉ. पवन मुंदडा, डॉ. राजहंस संदीप, डॉ़ राहुल महाजन, यांनी सहभाग नोंदवला तर डॉ. दिनेश नवगिरे, डॉ. नितीन ठाकूर, डॉ. बजरंग खडबडे डॉ. तिरुमल माळी, डॉ. मदन सूर्यवंशी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

Read More  शिशू मुद्रा लोनवरील व्याजदरात २ टक्के कपात; ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या