31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeलातूरऔरंगाबाद, उस्मानाबादचे नामकरण राज्य सरकारलाच नको आहे का?

औरंगाबाद, उस्मानाबादचे नामकरण राज्य सरकारलाच नको आहे का?

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव, असे नामकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या नोटिफिशेनमध्ये ‘इन डिस्टीक औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर’, ‘इन डिस्टीक उस्मानाबाद धाराशिव’, असा उल्लेख आहे. ही बाब निदर्शनास आणुन देताच राज्य सरकारने तत्काळ नोटिफिकेशन काढले. परंतु, केंद्र आणि राज्य सरकारच्या नोटिफिकेशनमध्ये तफावरत दिसून येत आहे. त्याविरोधात कोणीतरी न्यायालयात जावे, असे राज्य सरकारला वाटते काय?, औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण राज्य सरकारलाच नको आहे काय?, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने शनिवारपासून राज्यभर शिवगर्जना अभियानास सुरवात करण्यात आली. या अभियानानिमित्त विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या केंद्र सरकारच्या नोटिफिकेशनमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या इशा-यावर चालणारे राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील जनतेत शिवसेनेबाबत संभ्रम निर्माण केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांमध्ये अफवा पसरवून, प्रलोभने दाखवून दिशाभूल केली जात आहे. परंतू, मासबेसवर शिवसेना उभी असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आम्हा सर्वांचा प्रचंड विश्वास आहे. तो विश्वास आणखी दृढ व्हावा, यासाठी शिवगर्जना अभियानाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. सत्ताधा-यांनी कितीही आदळा-आपट केली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूकसान होणार नाही.

निलंगा तालुक्यातील हासोरी येथे भूगर्भातून सतत गुढ आवाज येत आहे. ग्रामस्थ भयभित झाले आहेत. प्रशासन मात्र हा भूंकप नाही, असे सांगत आहे. मेला म्हणजेच भूकंप का?, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. या गावाला मी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली असून या विषयावर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याचे नमुद करुन विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारच्या गलथान कारभारामुळे राज्याची अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे. नूसताच घोषणांचा पाऊस आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक्षात मात्र कोठेच गुंतवणुक दिसून येत नाही. आयात-निर्यात धोरण चूकीचे असल्यामुळे सोयाबीन, कापूस, हरभरा आदींना योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विकास कामांना दिलेल्या स्थगितीमुळे ५० टक्के रक्कम पडून आहे. सरकार कसलाही निर्णय घेत नाही. त्यामुळे राज्याचा विकास गेल्या सहा-सात महिन्यांत ठप्प झाला आहे. राज्यातील जनतेची सरकारकडून फसवणूक होत आहे. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने, संतोष सोमवंशी, शोभा बेंजरगे, पप्पू कुलकर्णी, नामदेव चाळक, सुनिता चाळक, सुनिल बसपूरे यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या