26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home लातूर डोंग्रज १५ दिवसांपासून अंधारात

डोंग्रज १५ दिवसांपासून अंधारात

डीपी जळाल्याने वीज गायब; ग्रामस्थ संकटात मात्र महावितरण ढिम्म

एकमत ऑनलाईन

लातूर : डोंग्रज (ता.चाकूर) हे गाव गेल्या १५ दिवसांपासून अंधारात बुडाले आहे. १५ दिवसांपुर्वी डोंग्रज गावाला वीजपुरवठा करणारा डीपी जळाला. मात्र १५ दिवसांनंतरही त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

वीज नसल्याने गावात केवळ अंधाराचेच साम्राज्य निर्माण झालेले नसून गावातील पिठाच्या गिरण्याही बंद आहेत. ग्रामस्थांना जेवणाचेही वांदे निर्माण होण्याची वेळ आली आहे. शेतक-यांना रब्बी पिकांना सिंचन करण्यासाठी पाण्याचा उपसा करता येत नसल्याने पिके संकटात सापडली आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
यंदा कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. मात्र स्मार्ट फोनची बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महावितरणच्या संथ कारभारावर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. महावितरणने तत्काळ दखल घेऊन डीपी दुरुस्त करुन द्यावी, अशी मागणी नागरिकांसह ग्रामपंचायतीनेही केली आहे.

भंडारा पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या