33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर बर्ड फ्लूला घाबरु नका; सतर्क रहा!

बर्ड फ्लूला घाबरु नका; सतर्क रहा!

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर व औसा या तीन तालुक्यातील चार गावांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून काही पक्षी बर्ड फ्लूने मृत्यू पावल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र नागरिकांनी या आजाराला घाबरु नये, तर सतर्क राहावे आणि पक्षी मयत झाल्यास जिल्हा प्रशासनास कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी, उदगीर तालुक्यातील सुकणी व तोंडार, औसा तालुक्यातील खुर्दवाडी या ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या दगावल्याचे निदान झाले आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतरस्त्र होऊ नये व त्याचा प्रसार प्रतिबंधीत करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे तसेच कुक्कुटपालकांनी पक्षी मयत झाल्यास तात्काळ जिल्हा पशुसंवर्धन विभाग अथवा नजीकच्या पशु वैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

तसेच बर्ड फ्लूबाबत कुक्कुट पालकांनी, दुकानदारांनी आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी व उपाययोजना कोणत्या आणि कशा कराव्यात याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. चिकन विक्रेत्यांनी फार्मवरुन आजारी, मलुल पक्षी आणणे टाळावे. चिकन विक्रेत्यांनी मास्क, हॅन्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, दुकानात पक्षी ठेगवण्याच्या खुराड्याची नियमित साफसफाई करावी, स्वच्छता ठेवावी. दुकानाचा परिसर नियमित फवारणी करुन निर्जंतुक करावा, परिसरातील उडलेल्या पक्षांचे पंख जाळून टाकावे, वेस्ट मटेरियल प्लास्टिक बँगध्ये बंदीस्त करुन पुरुन टाका. दुकान बंद करताना सर्व उपकरणे स्वच्छ करण्याची तसेच दुकानाचे निर्जंतुकीकरण करण्याची दक्षता घ्यावी, संशयित, प्रादुर्भाव झालेल्या फार्मवरुन कोंबड्यांची, पक्ष्यांची वाहतूक, खरेदी, विक्री, खाद्य वाहतूक करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्धा तास शिवजलेली अंडी, चिकन खाणे सुरक्षित
पूर्ण ३० मिनिटे शिजवलेली अंडी व चिकन मांस खाणे पूर्णत: सुरक्षित आहे. कच्चे चिकन, मांस व कच्चे अंड्यांचे सेवन करु नये, चिकन विकत घेताना विक्रेत्याकडील पक्षी मलुल, संथ, आजारी नाहीत याची खात्री कराी. आपल्या परिसरात कावळा, बगळा, कबुतर पक्षी मृत अवस्थेत आढळल्यास त्याला स्वत: हात लावू नका, संबंधीत यंत्रणेच्या सफाई कामगारांस कळवावे. बर्ड फ्लू आजार पक्ष्यांपाासून थेट माणसास होण्याची शक्यता खुपच कमी असते. या विषाणुचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही. अफवा व अकारण भीती पसरविणा-यांपासून सावध राहा.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या