35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home लातूर किराणा सोबत कोरोना घेऊन घरी येऊ नका-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

किराणा सोबत कोरोना घेऊन घरी येऊ नका-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

एकमत ऑनलाईन

उद्यापासून भाजीपाला, किराणा, मटन, चिकन, बॅँक सेवा सुरू होणार

लातूर : उद्या पासून भाजीपाला, किराणा, मटन, चिकन, बॅँक सेवा सुरू होणार आहे. मात्र १७ पासून कपडे व्यापारी दुकान उघडू शकतात. बाहेर पडत असताना किराणा दुकानातून वस्तू घेताना सॅनिटायझरचा वापर वारंवार करणे आवश्यक आहे. वारंवार तोंडाला, गालाला हात लावू नये, मास्कचा काटेकोरपणे वापर करावा. हॅन्ड सॅनिटायझर सोबत ठेवावे, सोशल डिस्टन्स पाळावे. अचानकपणे सर्व मार्केट सुरू झाल्यानंतर गर्दी होणार असून ती कशी टाळता येईल ते पहावे मात्र किराणा सोबत कोरोना घेऊन घरी येऊ नका असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की उद्या बाजार उघडणार आहे, प्रत्येक ठिकाणी पहारा देण्यासाठी पोलिस किंवा इतर यंत्रणा ठेवणे शक्य नाही. सोशल डिस्टन्स व इतर काळजी घेण्याची जबाबदारी ही आपली स्वत:ची आहे. नियम पाळले नाहीत म्हणून दंड आकारणे ही काही प्रशासनाला सवय नाही मात्र त्यातुन तुम्हाला काही सवय लागणे आवश्यक आहे. कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली होती. दंड लावण्यात येणार होता यामध्ये चिकन, मटन, भाजीपाला चे व्यापारी यांची कोरोना चाचणी करण्याचे ठरले होते. मात्र त्या ठिकाणी इतर व्यापा-यांनी येऊन गर्दी केली. काही दंड लागेल का या संदर्भात सर्वांच्या मनात भीती होती. मात्र १३, १४, १५, १६ या तारखांना कोणालाही दंड लागणार नाही. दुकान उघडण्यापूर्वी तपासणी करून घ्यावी असे सांगण्यात आले होते.

गणेश मुर्ती स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात येणार नाही

२२ पासून होणा-या गणेशोत्सवासाठी सर्वजनिक गणोत्सवानिमित्त स्टॉल लावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्यामुळे त्याठिकाणी परवानगी देण्यात येणार नाही असे लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. गणेशमुर्ती खरेदी करताना त्या ठिकाणी मुर्तीविक्रीसाठी स्टॉल लावले जातात त्या ठिकाणी गर्दी मुळे कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. सार्वजनिक गणोशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे टाळावे. शासनाने दिलेले नियम आहे ते पाळावेत. ऑनलाईन पद्धतीनेच शहरात गणेश भक्तांना मूर्ती खरेदी कराव्यात. शहरातच घरपोच गणेशमुर्ती मिळतील यापद्धतीने कार्य करावे.

१५ ऑगस्ट निमित्त काय म्हणाले जिल्हाधिकारी

१५ ऑगस्ट निमित्त १० लोकांना बोलावून ऑनलाईन प्रक्षेपण करू शकता. मोठ्या प्रमाणात घरामध्ये झेंडा लाऊ शकता. झेंड्यासंदर्भात कोणतेही कडक कायदे आपल्याकडे नाहीत. मात्र तुम्ही भितीपोटी झेंडा लावत नाहीत. घरावर, छतावर, घरात, अपपार्टमेंटमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता. नियमपुर्वक, झेंड्याचा कोणत्याही प्रकारे अपमान होत कामा नये अशी काळजी घेऊनच झेंडा फडकवता येईल. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना बोलवण्याची गरज नाही.

चुकीचे व्हिडिओ तयार करणा-या विरुद्ध फौजदारी करणार

कारोना रुग्णाचे नको त्या पद्धतीने चित्रण करून समाजात चुकीचा संदेश पसरवणा-यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. कोरोना रुग्णाचा नको त्या अवस्थेतील चित्रण थेट व्हारल करून, अपूर्ण माहिती लोकांसमोर मांडून समाजात चुकीचा संदेश पसरवल्याबद्दल गंभीर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रशासनाला सहकार्य करावे

शेतक-यांच्या निगडीत असलेल्या गोष्टी लवकरात लवकर चालू करण्यासंदर्भात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सुुचना दिल्या आहेत. त्यामुळे त्या संदर्भात टेस्टींग लवकरात लवकर करण्यात येतील. लवकरच ७५ हजार तपासणी किट उपलब्ध होणार आहेत.

नागरिकांनी संयम राखावा

कोरोना तपासणी ही लवकरात लवकर व्हावी असे लोकांना वाटते. मात्र कमी कालावधी मध्ये हे शक्य नाही. लोकांना थांबाव लाागत. कारण आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. आजचे काम संपले तर उद्याही त्यांना काम करावेच लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा.

तपासाणी करताना व्यापा-यांना द्यावा लागणार पुरावा

१३ ते १६ तारखे दरम्यान अंडे, चिक, मटन व्यापा-याचंी कोरोना तपासणी करण्यात येणार असून त्याकरीता रहिवासी, आधार, दुकान परवाना, असोसिएशन चे कार्ड असल्याशिवाय तपासणी केली जाणार नाही.

प्रोत्साहन अनुदानाचे ५० हजार रखडले

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या