32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeलातूरपंचनाम्याचा फार्स नको ; ओला दुष्काळ जाहीर करा

पंचनाम्याचा फार्स नको ; ओला दुष्काळ जाहीर करा

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ :- सप्टेंबरमधील मुसळधार पावसानंतर ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीत हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीनसह खरीप पिके हातची गेली असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ अतिवृष्टी जाहीर करुन आपत्ती व्यवस्थापनातून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.

अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील काढणीला आलेले सोयाबीन, खरीप हंगामातील पिके व शेती जमिनी वाहून गेली आहे.या बाधित क्षेत्रांच्या पंचनाम्याचा फार्स न करता, ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे.

पावसाने प्रदिर्घ ओढ दिल्यानंतर गेल्या महिन्यात तालुक्यात दमदार पावसाने सुरूवात झाली. सततच्या पावसाने सोयाबीन ला मोड फुटून मोठे नुकसान झाले असताना, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नदीनाल्यांना पुर येवून सोयाबीन सडले, गंजी वाहून गेल्या व खरीप पिकांसह शेतजमीनीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.सतत दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या शेतकऱ्यावर यंदा बोगस बियाणांमुळे दुबार -तिबार पेरणीचे संकट आले. त्यात गेल्या चार महिन्यापासूनच्या लॉक डाऊनमुळे व दुबार-तिबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना या अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी पुर्णतः खचला आहे.

यंदा अनेक अडचणीचा सामना करताना शेतकरी हैराण झाला असून या अतिवृष्टीने वर्षराचा खर्च भागविणारे सोयाबीन हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने पंचनाम्याचा फार्स न करता आपत्ती व्यवस्थापनातून तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी व सामान्य नागरिक आर्थिक संकटात; आर्थिक मदत करण्याची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या