34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home लातूर एमपीएससी परीक्षेला समाजाचा विरोध नको

एमपीएससी परीक्षेला समाजाचा विरोध नको

एकमत ऑनलाईन

लातूर : मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगळ्या स्तरावर आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनात एमपीएससी परीक्षेला विरोध होत आहे. मात्र हा विरोध चुकीचा असून, समाज बांधवांनी एमपीएससी परीक्षेला विरोध करु नये, अशी भूमिका अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी घेतली आहे.

अखिल भारतीय छावा संघटनेची बैठक गुरुवारी लातूर येथे झाली. या बैठकीत नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की, स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मोठा लढा उभारला. नंतरच्या काळात कोपर्डीच्या घटनेपासून मराठा समाज रस्त्यावर उतरला. समाजाने आरक्षणासह अनेक मागण्या लावून धरल्या. मराठा समाजाने दुस-या समाजावर अन्याय करुन आम्हाला आमच्या मागण्या मान्य करा, असे कधीही म्हटलेले नाही. हा समाज कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे.

सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन वाटचाल करणारा समाज आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षेला विरोध करणे चुकीचे आहे. इतर जाती-धर्मातील विद्यार्थ्यांचे नुकसान तसेच मराठा समाजातील उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांचेही यात नुकसान आहे. त्यामुळे परीक्षेला विरोध करु नये. सरकारच्या नोकरभरतीला विरोध करावा. विद्यार्थ्यांना वेठीस धरुन महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आंदोलन करणार नाही, ही भूमिका छावा संघटनेची पूर्वी होती आणि पूढेही
राहणार आहे, असेही नानासाहेब जावळे पाटील म्हणाले.

या बैठकीला भीमराव मराठे, विजयकुमार घाडगे-पाटील, पंजाबराव काळे पाटील, आप्पासाहेब कुडेकर, संतोष जेधे, गोविंद मुळे, सिद्धाजी जगताप, माधव ताटे, दशरथ कपाटे, परमेश्वर जाधव, अशोक रोमण, विशाल श्रीरंग, किशोर शिरवत, देवकर्ण वाघ, अशोक मोरे, श्विाजी मारकंडे, शशिकांत पाटील, छत्रपती शिंदे, आकाश पाटील, राजाभाऊ गुुंजरगे, संजय राठोड, विजय मोरे, बाजीराव एकुगे आदींची उपस्थिती होती.

तलवार कोणाविरुद्ध उपसणार ? विजय वडेट्टीवार यांचा खासदार संभाजीराजेंना सवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या