22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

पायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर : मागच्या आठ दिवसात लातूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येत सातत्यांने घट होत आहे, ही समाधानाची बाब आहे असे नमूद करुन यापुढे कोणत्याही परिस्थीतीत रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी यंत्रणा गतीमान ठेवा. सद्या उपचाराधीन असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत आणि संभाव्य तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सद्याच्या तुलनेत दुपटीने व्यवस्था उभाराव्यात हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करावे, असे
निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी प्रशासन आणि आरोग्य विभागाला दिले आहेत.

सोमवार दि. १७ मे रोजी दुपारी १२ वाजता लातूर जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भाव औषध व सुवीधांची उपलब्धता, ऑक्सिजन प्लांटची उपलब्धता आणि तिस-या लाटे संदर्भात घ्यावयाची दक्षता या संदर्भाने लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मंत्रालय येथून दुरदृष्य माध्यमाव्दारे आढावा बैठक घेतली योवळी ते बोलत होते. या बैठकीस राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धिरज विलासराव देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आदी सहभागी झाले होते.

या बैठकी दरम्यान जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भावा संदर्भातील सद्य परिस्थीती जाणून घेतल्या नंतर पालकमंत्री देशमुख यांनी रुग्णसंख्येत घट होत असले बाबत समाधान व्यक्त केले. जे रुग्ण बाधीत होवून येत आहेत त्यांच्यावर वेळेत उपचार करावेत म्युकरमाइकोसीस रुग्ण वाढू नयेत यासाठी जिल्ह्यातील टास्क फोर्सने जागृती मोहिम राबवावी या आजारानेग्रस्त असलेल्या रुग्णांना त्यांना हवी असलेली औषधे मिळवून देण्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत हे करीत असतांना कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेवून जिल्ह्यातील ऑक्सिजन, व्हेंन्टिलेटर बेडची संख्या दुपटीने वाढवावीत. जिल्ह्यासाठी आवश्यक असणारा लस पुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुलभ पध्दतीने लसीकरण मोहिम गतीमान करावी, जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारीत कुटूंब प्रमुख मृत्यु पावलेल्या कुटूंबाची यादी तयार करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी बैठकी दरम्यान दिले आहेत.

या बैठकीत बोलतांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी नियोजन उत्तमरीतीने केले आहे. त्यांची अंमलबजावनीही त्याच पध्दतीने करावी असे सांगितले. जळकोट परीसरात आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध होत नाहीत त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असेही त्यांनी म्हटले. चाकूर येथील कोवीड केअर सेंटरची व्यवस्था पूढेही सुरु ठेवावी, अहमदपूर येथील रुग्णालयात व्हेंन्टिलेटर तसेच वॉशिग मशीनची सुवीधा उपलब्ध करावी, लहान मुलांच्या आधार नोंदणीची व्यवस्था उभारावी आदी सुचना आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी मांडल्या त्या तातडीने मंजूर करून कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिल्या. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी बीपी पृथ्वीराज यांनी जिल्हयातील कोरोना प्रादूर्भाव संदर्भातील आढावा सादर करून संभाव्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली.

जिल्हा व तालुकास्तरावर बालकासाठी विशेष कक्ष उभारावे
जिल्हा व तालुकास्तरावर बालकासाठी विशेष कक्ष उभारावे, शासकीय रुग्णालयातील मंजूर १३ ऑक्सिजन प्लांट तातडीने उभारावेत, मनुष्यबळ प्रशिक्षणाचा कार्यक्रम ताबडतोब राबवावा, आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची भरती करावी, उपचाराधीन रुग्णांची वेळेत माहिती देणारी यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सुचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या आहेत.

बेड उपलब्धतेची माहिती देणारी यंत्रणा उभी करा
प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपटीने सुवीधा उभारणे शक्य नाही त्यामुळे समाज कल्याण वसतीगृह व इतर ठिकाणी उभारलेल्या कोवीड केअर सेंटरच्या ठिकाणी या सुवीधा उभाराव्यात. संभाव्य तिस-या लाटेत औषधाचा तुटवडा निर्माण होणार नाही याची आताच दक्षता घ्यावी, मुंबई महापालीका धर्तीवर कोणता रुग्ण कुठल्या रुग्णालयात दाखल आहे, कुठे बेड उपलब्ध आहेत याची तत्काळ माहिती उपलब्ध करुन देणारी यंत्रणाही कार्यान्वित करावी अशी सुचना आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिली.

हिंगोलीत मोफत बियाणांसाठी शेतक-यांची गैरसोय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या