21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरडॉ. बिडवे यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्रदान

डॉ. बिडवे यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्रदान

एकमत ऑनलाईन

चाकूर : एक ऑगस्ट या महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्या हस्ते जिल्ह्यातील तहसिलदार संवर्गातून चाकूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांना ‘उत्कृष्ठ तहसिलदार’ हा पुरस्कार मिळाला. २०२१-२२ या महसुली वर्षामध्ये चाकूर तालुक्याला देण्यात आलेला महसूल वसुलीच्या उद्दीष्ठापेक्षा अधिक म्हणजे १०८ टक्के वसुली करून शासनाच्या महसुलात भर घातली आहे. तसेच शासनाचा महत्त्वकांशी ई पीक पाहणी’ प्रकल्पात चाकूर तालुका हा सर्वात प्रथम १०० टक्केकाम पूर्ण केलेला तालुका ठरला.

तालुक्यातील शिवरस्ते अतिक्रमणमुक्तकरण्यात यश, ४० ते ५० वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करून सोडविणे, कोरोना कालावधीत केलेले उत्कृष्ठ नियोजन व याबरोबरच निवडणुकांचे यशस्वी आयोजन प्रत्येक कामात वेगळा ठसा उमटविणारे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांनी मागच्या तीन वर्षात केलेल्या कामाची पावतीच आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या