22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरडॉ. देवधर यांची रुग्णसेवा सदनला २५ लाखांची देणगी

डॉ. देवधर यांची रुग्णसेवा सदनला २५ लाखांची देणगी

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील रुग्ण सेवा सदन उभारणीसाठी विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अरुणा महेश देवधर यांनी त्यांचे काका व काकू स्व. अनंत सदाशिव ओक व स्व. लीला अनंत ओक (रोहा, जि. रायगड )यांच्या स्मरणार्थ व्यक्तिगत देणगी म्हणून २५ लाख रुपयांचा धनादेश रुग्णसेवा प्रकल्पाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांच्याकडे सुपुर्द केला.

कर्करोगी रुग्णांना लातुरात मिळत असलेल्या योग्य उपचारामुळे धोका कमी झाला असला तरी रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या रुग्णांची विवेकानंद कँसर हॉस्पिटलमध्ये रेडिएशन व केमोथेरपीची सोय आहे. त्यासाठी रुग्णांना साधारण ८ ते ३०दिवस दररोज उपचारासाठी १ तास यावे लागते. असे १०० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दररोज येत आहेत.या रुग्णांची ये-जा करण्यात होणारी हेळसांड थांबवण्यासाठी लातूरचे सुपुत्र व टाटा कँसर हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास शर्मा यांच्या सूचनेनुसार जलयुक्त लातूरच्या टीमने भव्य असे ‘रुग्णसेवासदन’ लोकसहभागातून बांधण्याचा संकल्प केला आहे. विवेकानंद रुग्णालयाच्या अंतर्गतच रुग्णसेवा सदन समितीच्या माध्यमातून हे कार्य सुरु असून १५० रुग्ण व प्रत्येकी एक नातेवाईक यांची निवास व भोजन व्यवस्था नाममात्र दरात करण्यात येणार आहे .

यासाठी एमआयडीसीमधील विवेकानंद कँसर हॉस्पिटल शेजारी दोन एकर जागा टकऊउ कडून घेतली असून या प्रकल्पात १२ डॉर्मेटरी, २४ जनरल रूम व ३६ स्पेशल रूम असणार आहेत.याबरोबरच अत्याधुनिक यंत्रणा असलेले २५०० चौरस फुटांचे सभागृह व १५०० चौरस फुटचा भोजन कक्ष असणार आहे. या प्रकल्पाचे तीन मजली बांधकाम ८० हजार चौरस फुटमध्ये होणार आहे.एक एकर जागा बाग बगीचासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ९ कोटी रुपये खर्च येणार असून हा सर्व निधी लोकसहभागातून उभारला जाणार आहे.याकामी समाजातून उत्तम प्रतिसाद मिळत असून बांधकाम प्रगतीपथावर आहे. तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून गिलावा, प्लम्बिंग आदी कामे सुरू आहेत.याच कार्यक्रमात डॉ.सौ.अरुणा देवधर यांनी मातोश्री वृद्धाश्रमासाठी २ लाख रुपयांचा निधी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ.महेश देवधर यांच्याकडे सुपूर्द केला. डॉ.अशोकराव कुकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या छोट्याशा कार्यक्रमास डॉ. योत्स्ना कुकडे, अनिल अंधोरीकर, रुग्ण सेवा सदनचे सहसचिव शिवदास मिटकरी यांची उपस्थिती होती.

ऑक्सिजन निर्मितीसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन देणार-राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या