लातूर : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूरच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण रविवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता येथील डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचे अध्यक्ष अॅड. एस. एन. बोडके यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सोमनाथ रोडे उपस्थित राहणार आहेत. भारत सातपूते, रंजना सानप, हरिश्चंद्र पाटील, प्रा. डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे, पांडूरंग कांबळे, युवराज नळे, रमेश हनमंते, डॉ. राजश्री पाटील, गणेश भाकरे, हबीब भंडारे, रमेश वंसकर, प्रा. सुमती पवार, रश्मी गुजराती, प्रा. वसंत गिरी, तुळशीराम बोबडे, प्रा. विठ्ठल घुले, प्रा. गौत्तम गायकवाड व प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहित्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहावे, असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष अॅड. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष अॅड. श्रीधर गायकवाड, सचिव प्रकाश घादगिने, उपाध्यक्ष प्रा. डॉ. माधव गादेकर, सहसचिव अॅड. अंगद गायकवाड, कोषाध्यक्ष वामन कांबळे, सदस्य उत्तम दोरवे, छगन घोडके, अर्जुन कांबळे, नागनाथ कलवले, डॉ. संजय जमदाडे, कुसूमताई बोडके, वंदना गादेकर यांनी केले आहे.