27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरमहिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे डॉ. अर्चनाताई पाटील, अदिती देशमुख यांच्या हस्ते...

महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे डॉ. अर्चनाताई पाटील, अदिती देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लाला (लातूर लेडीज) ग्रुपच्या महीला मदत केंद्र माध्यमातून महिलांच्या लघू उद्योग व मोठे उद्योगात महीलांनी तयार करण्यात आलेल्या वस्तुचे दि. २९ जूलै ते ३१ जूलै दरम्यान तीन दिवसीय प्रदर्शन लातूर येथील श्याम मंगल कार्यालय येथे भरवले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर व ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि., च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते झाले.

लातूर शहरातील महीलाच्या पूढाकारातून लाला (लातूर लेडीज) ग्रुपच्या महीला मदत केंद्र माध्यमातून महिलांनी लघू उद्योग व मोठे उद्योगाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूचे प्रर्दशन लातूर येथील श्याम मंगल कार्यालय येथे दि. २९ जूलै ते ३१ जूलै दरम्यान भरवले आहे. या तीन दिवशीय प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. सण उत्सवासाठी लागणा-या वस्तू, डिझायनर ब्लाऊज, साडी, कुर्ती, तसेच ज्वेलरी अशा अनेक वस्तूच्या वेगवेगळ्या स्टॉलने मंगल कार्यालय गजबजून गेले आहे.

या कार्यक्रम प्रसंगी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर व ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि., च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांनी महिलांची गरज ओळखून त्यांच्यासाठी हे मार्केंिटगचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल लाला ग्रुपच्या संचालिका सौ. रेश्मा अग्रवाल व संपूर्ण टीमचे मनस्वी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमास डॉ. सुरेखा काळे, सौ. मीना गायकवाड, संगीता मोळवणे, सौ. सपना किसवे, सौ. रागिनी यादव, सौ. स्वाती घोरपडे, सौ. श्वेता लोंढे, सौ. शोभाताई पाटील, सौ. भाग्यश्री कोळखैरे, सौ. जान्हवी सूर्यवंशी, सौ. वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनीषा वैद्य यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या