27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरडॉ. जगदाळे यांनी घेतले कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थिनीचे पालकत्व

डॉ. जगदाळे यांनी घेतले कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थिनीचे पालकत्व

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मागील दोन वर्षात कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे सा-या जगाला विळखा घतला होता. त्याचा अनेक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला. कोरोनामुळे काही घरातील कर्ते पुरुष गतप्राण झाले. अशा दु:खद प्रसंगी त्यांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण झाले. आशा परिस्थितीत दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ. संदीपान जगदाळे यांनी कोरोनामुळे अनाथ झालेले जे विद्यार्थी दयानंद कला महाविद्यालयात प्रवेश घेतील आशा मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचा संकल्प केला होता.

दयानंद कला महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकणा-या भक्ती जोशी हिच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे डॉ. जगदाळे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून तिला वह्या, पुस्तके, पेन, कंपास असे शैक्षणिक साहित्य, गणवेश, प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क देऊन तिचे शैक्षणिक पालकत्व घेतले. इयत्ता अकरावी पासून तिचे मानसिक मनोबल उंचावून तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डॉ. जगदाळे यांनी प्रयत्न केले.

शैक्षणिक साहित्याचे वितरण प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे डॉ. देवेंद्र कुलकर्णी डॉ. दयानंद शिरुरे, डॉ. गोपाल बाहेती, प्रा. दिनेश जोशी, प्रा. सुरेश क्षीरसागर, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव, विकास खोगरे आदी उपस्थित होते.

डॉ. जगदाळे यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, शालेय समिती अध्यक्ष ललितभाई शहा, उपाध्यक्ष रमेश राठी, सरचिटणीस रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, विभागीय मंडळ अध्यक्ष सुधाकर तेलंग, सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी नागेश मापारी,उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी कौतुक केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या