22.1 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeलातूरडॉ. दाभोळकर यांच्या ‘अंनिस’ चळवळीचे केंद्र लातूर

डॉ. दाभोळकर यांच्या ‘अंनिस’ चळवळीचे केंद्र लातूर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीची चळवळ राज्यात प्रभावीपणे चालविली. बुवाबाजिविरुद्ध लढताना त्यांना अनेकवेळा संघर्षाचा सामना करावा लागला. डॉ. दाभोळकर यांच्या चळवळीचे केंद्र आला लातूर बनले आहे. त्याचे सर्व श्रेय माधव बावगे यांना जाते, असे गौरोद्गार माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांनी येथे काढले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल नुतन कार्याध्यक्ष माधव बावगे यांचा रविवारी ३ जुलै रोजी लातूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. वाघमारे बोलत होते. यावेळी राज्य कार्यकारीणीवर निवड झालेले राज्य सरचिटणीस रुक्साना मुल्ला, राज्य कार्यवाह दिलीप अरळीकर, राज्य कार्यवाह बाबा हलकुडे, राज्य निमंत्रक हरिदास तमेवार, उत्तरेश्वर बिराजदार, तसेच लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित निर्भय कोरे यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘अंनिस’ चे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मनोहरराव गोमारे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल लहाने, प्राचार्य डॉ नागोराव कुंभार ‘अंनिस’ चे राज्य प्रधान सचिव प्रा. संजय बनसोडे, राज्य कार्यवाह मनोहर जयभाये, सुधाकर तट, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माधव बावगे यांनी आपल्या आज ‘अंनिस’ च्या राज्यात ४३३ शाखा ३६ जिल्ह्यांत आल्याचे सांगितले तर शासनाच्या वतीने ‘अंनिस’ शिक्षकांसाठी साधन व्यक्ती म्हणून प्रशिक्षण देते ‘अंनिस’ च्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ३२ शाखा आसल्याचा आवर्जून उल्लेख केला. या प्रसंगी डॉ विठ्ठल लहाने, प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांची भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप अ‍ॅड. मनोहर गोमारे यांनी केला. प्रारंभी दिलीप अरळीकर यांनी प्रास्तविक केले. अनिल दरेकर यांनी शेवटी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. डॉ. दशरथ भिसे, प्रा. हनुमंत मुंढे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या