30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home लातूर पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचा लातूर कपडा बँकेतर्फे गौरव

पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचा लातूर कपडा बँकेतर्फे गौरव

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर कपडा बँकेच्या वतीने सामाजिक उपक्रमाचा एक धागा बनण्यासाठी लातूरचे सुपूत्र पद्मभूषण सन्मानीत डॉ. अशोक कुकडे यांनी दि,. २ डिसेंबर रोजी लातूर कपडा बँकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी लातूर कपडा बँकेचे कामकाज, व्यवस्थापन आणि उपक्रमाची त्यांनी पाहणी केली. तसेच डॉ. लातूर कपडा बँकेसाठी काही कपडे ही डोनेट केले. यावेळी लातूर कपडा बँकेच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

समाजातील दानशूर व्यक्तींनी लातूर कपडा बँकेच्या या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. अन्न, वस्त्र,निवारा या मुलभूत गरजांपैकी एक घटक असणारी कपड्यांची गरज पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मत त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. त्याचबरोबर लातूर कपडा बँकेची ही टीम मागील पाच वर्षांपासून परिश्रम घेऊन समाजातील दूर्बल, दूर्लक्षीत आणि गरजू व्यक्तींना जी सेवा देत आहे त्याचे व शिवाजी चौकातील आपली मोक्याची जागा विनामूल्य कपडा बँकेस दिल्यामुळे अग्रवाल परिवाराचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ही सामाजिक चळवळ मोठ्या प्रमाणात वाढावी म्हणून सर्वांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा. आपल्याकडे जास्त असणारे कपडे समाजातील गरजूंना द्यावेत, आणि ज्यांच्याकडे कपडे नाहीत अशांना लातूर कपडा बँकेपर्यंत पोहचवण्याचे पुण्यकर्म करावे अशी कळकळीची विनंतीही त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाला लातूर कपडा बँकेचे अध्यक्ष डॉ. अजय पुनपाळे, संकल्पक व प्रेरणास्थान डॉ. संतोषकुमार डोपे, लातूर कपडा बँकेचे सचिव डॉ. अर्चना कोंबडे व डॉ. ज्योती सुळ, कार्यकारी सचिव सुनिलकुमार डोपे, सहकोषाध्यक्ष डॉ. शितल भावसार तसेच प्रशांत जाधव, कृष्णा ठाकुर, पत्रकार अजय घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले तर सुत्रसंचलन सुनिलकुमार डोपे यांनी व आभार प्रदर्शन डॉ.अर्चना कोंबडे यांनी केले.

अखेर शाळेची घंटा वाजली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या