24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरडॉ. कराड वर्ल्ड पीस स्कूलमध्ये परिसंवाद

डॉ. कराड वर्ल्ड पीस स्कूलमध्ये परिसंवाद

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल, या शाळेमध्ये दिनांक २७ एप्रिल रोजी सायबर क्राईम व सेक्युरीटी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शाळेचे प्राचार्य नितीन खिस्ते, कार्यालयीन प्रमुख संगमेश्वर बेंबळगे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस सब इनीस्पेक्टर अवेज काझी यांची उपस्थिती लाभली होती.

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच सोशल मिडिया व ऑनलाइन गेमचा वापर सर्रास होताना दिसत आहे त्यामुळे या सायबर विभागातील धोके ओळखून डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूलमधील विदयार्थ्यांनां सतर्क करण्याच्या हेतूने पोलीस सब इनीस्पेक्टर अवेज काझी यांनी विदयार्थ्यांनां मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील प्रश्न देखील अवेज काझी यांना विचारले. विद्यार्थ्यांना सायबर सेलमधील विविध करियर संधीबद्दलही मार्गदर्शन केल्यामुळे प्राचार्यांनी त्यांचे आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या