लातूर : प्रतिनिधी
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहाविद्यालयात भूगोल दिनानिमित्त दि. २४ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात श्यामसुंदर उबाळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूषण पूरस्काराने पाहूण्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य अंगदराव तांदळे होते. यावेळ प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. राजगोपाल तापडीया यांची उपस्थिती होती. यावेळी ‘वातावरणातील बदल व आरोग्य’ या विषयावर डॉ.राजगोपाल तापडीया यांचे व्याख्यान झाले.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. शिवाजी गाढे, सुरेश जोंधळे व शिक्षकेत्तर कर्मचारी भागवत गोडबोले यांचाही सत्कार मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बालाजी कांबळे, डॉ. नंदकुमार मगर, जब्बार सर व उपप्राचार्य भालचंद्र येडवे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ.राजाराम दावणकर, सुधाकर सुर्यवंशी यानी केले. पूजा नरवटे हिने आभार मानले.