23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरउड्डाणपुलाच्या भुयारी मार्गातील पाणी काढून वाहतूक व्यवस्था केली सुरळीत

उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गातील पाणी काढून वाहतूक व्यवस्था केली सुरळीत

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उड्डाणपुलाच्या खालील भुयारी मार्गात साचलेले पाणी काढून वाहतुकीतील अडथळा दूर करण्यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत सदरील ठिकाणची वाहतूक सुरळीत केली आहे.

मागच्या दोन दिवसांत झालेल्या पावसानंतर लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूस असलेल्या भुयारी मार्गात पाणी थांबून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, नागरिकांनी यासंदर्भातील छायाचित्रासह तक्रार पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यापर्यंत पोहचवली होती. पालकमंत्री श्री देशमुख यांनी या तक्रारींची तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाला सदरील ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. पालकमंत्री श्री देशमुख यांच्या निर्देशानंतर महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल तसेच नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही केली. मुख्य स्वच्छता निरीक्षक रमाकांत पिडगे तसेच स्वच्छता निरीक्षक सदाजी मोरे यांनी सदरील ठिकाणी जाऊन निरीक्षण केले. उड्डाणपुलाखालील पाणी वाहून जाण्यात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली. त्यानंतर पाण्याचा निचरा होऊन वाहतूक सुरळीत झाले आहे. भविष्यात पुन्हा अडचण निर्माण होऊ नये याचे नियोजन करण्यात येत असल्याचे नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी सांगितले,

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून शहरात कुठेही पाणी थांबून वाहतुकीला अडचण निर्माण होऊ नय. त्याचबरोबर, कच-याची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यासंबंधीच्या सूचना पालकमंत्री श्री देशमुख यांनी दिल्या असून त्यादृष्टीने दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या