23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गावांमध्ये ‘ड्रोन’ सर्वेक्षणाचा सय्यद अंकुलगा येथून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या ड्रोन’द्वारे सर्वेक्षणामुळे प्रॉपर्टी कार्ड निर्मिती होऊन ग्रामपंचायतचे उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे. पहिल्या दिवशी तालुक्यातील सय्यद अंकुलगा,कळमगाव,ंिभगोली,बेवनाळ, उमरदरा, डोंगरगाव बो., कांबळगा,आरी या आठ गावांत ड्रोन सर्वेक्षण करण्यात आली आहे.

याप्रसंगी उपअधीक्षक भूमी अभिलेख शिरूर अनंतपाळ एस.बी.देशमुख,सर्वे ऑफ इंडियाचे किशोर केंद्रे, भूमी अभिलेख मुख्यालय सहाय्यक व्ही.के.टेकनूर, कोरबू, गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, सय्यद अंकुलगा सरपंच ओमप्रकाश सारोळे, उपसरपंच मिर्झा माजीद बेग, ग्रामसेवक आर.के. कुटवाडे, बीट जमादार गोंिवंद मलवाड, पोलीस पाटील सय्यद फारूक पाशाहुसेनी, उमरदरा माजी सरपंच रामभाऊ नलवाडे, सर्व गावाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. तालुक्यातील गावांमध्ये मालमत्तेचे सिटी सर्व्हेचे नकाशे तयार नसल्याने अनेक जमिनींच्या मालकी हक्कावरून वाद झाले.

या पार्श्वभूमीवर मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड तयार करणे व त्याद्वारे ग्रामपंचायतींना कर आकारणी करणे शक्य व्हावे,यासाठी तालुक्यातील गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फेत ‘ड्रोन’ सर्वेक्षण करण्यात येत आहे. या ड्रोन सर्वेक्षणामुळे ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार, प्रत्येक व्यक्तीची मालमत्ता, सीमारेषा, रस्ते, गल्ली क्रमांक कळणार, सरकारी मालमत्तेचे संरक्षण होणार, मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार, गावांच्या हद्दीतील मिळकतींचा नकाशा तयार होणार, बांधकाम परवाने मिळणार असे अनेक फायदे होणार असून प्रत्येक गावातील व्यक्तीचे मिळकत पत्रक तयार झाल्यावर संबंधिताला घरावर कर्ज घेणे सहज शक्य होईल, बांधकाम परवानगी, अतिक्रमण काढणे आणि मालमत्तेचा नकाशा तयार करणे सोपे होईल,असे उपाधीक्षक भूमी अभिलेख शिरूर अनंतपाळ एस.बी. देशमुख व अभिलेख सहाय्यक व्ही.के.टेकनूर यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या